शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

वडाळागावातील जनावरांच्या गोठ्यांमुळे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:52 IST

वडाळागावातील जनावरांच्या गोठ्यांमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, महापालिकेने गोठेधारकांना फक्त नोटिसा बजावून फक्त सोपस्कार पार पाडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

इंदिरानगर : वडाळागावातील जनावरांच्या गोठ्यांमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, महापालिकेने गोठेधारकांना फक्त नोटिसा बजावून फक्त सोपस्कार पार पाडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.  वडाळागावात सुमारे ४५ वर्षांपूर्वी शेतीव्यवसाय होता. शेतकरी व हातावर काम करण्याची वस्ती म्हणून गावाची ओळख आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी शेतीला जसजसा भाव मिळत गेला तसतशी जमीन विकली गेली. गावात झीनतनगर, मेहबूबनगर, अण्णा भाऊ साठेनगर यांसह विविध उपनगरे अस्तित्वात येऊन विस्तार वाढतच चालला आहे. सुमारे बारा हजार लोकवस्ती असलेले गाव असून, सुमारे दहा वर्षांपूर्वी एक ते दोन जनावरांचे गोठे होते. आता त्यांची संख्या तीस ते पस्तीसच्या घरात गेली आहे. प्रत्येक जनावरांच्या गोठ्यामध्ये सुमारे चारशे ते पाचशे जनावरे आहेत. त्या जनावरांच्या मलमूत्राचा प्रश्न निर्माण होत असल्याने बहुतेक गोठेधारकांनी सर्रासपणे जनावरांचे मलमूत्र गोठ्याबाहेर खड्डा करून किंवा बाहेर सोडून दिले आहे. या संदर्भात महापालिकेला निवेदन देऊनसुद्धा अद्यापी जनावरांचे गोठे हटवले जात नाही. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी गावात विषाणूजन्य आजाराचा फैलाव झाला होता त्यामुळे गावात रुग्णांची संख्या वाढली होती. असे असतानाही कोणती कारवाई होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.पाणी रस्त्यावर वाहतेकाही गोठेधारकांनी मलमूत्र नाल्यांमध्ये सोडून दिले आहे. हे नाले विविध कॉलनी आणि सोसायट्यांमधून जात असल्याने त्यातून घाण आणि दुर्गंधी पसरली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने पावसाचे पाणी नाल्यात जाऊन मलमूत्र दुतर्फा रस्त्यावर वाहत असते.

टॅग्स :Healthआरोग्यNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका