शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

विठू माउली तू माउली जगाची...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 01:17 IST

सकाळपासून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लागलेल्या रांगा, मंदिरांसह घरोघरी सुरू असलेला विठूनामाचा गजर, टाळ-मृदुंगाचे निनादणारे स्वर, देवपूजा, दर्शनानंतर खिचडी, फळे आदींच्या सेवनाद्वारे केलेला सात्विक उपवास अशा भक्तिमय वातावरणात शहरात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली.

नाशिक : सकाळपासून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लागलेल्या रांगा, मंदिरांसह घरोघरी सुरू असलेला विठूनामाचा गजर, टाळ-मृदुंगाचे निनादणारे स्वर, देवपूजा, दर्शनानंतर खिचडी, फळे आदींच्या सेवनाद्वारे केलेला सात्विक उपवास अशा भक्तिमय वातावरणात शहरात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. शहरातील विठ्ठल मंदिरे रोषणाईने न्हाऊन निघाली होती. शहरातील कॉलेजरोड, गंगाघाट, खोडेनगर, सिडको, सातपूर, मेरी, नाशिकरोड आदी ठिकाणच्या मंदिरांमध्ये आबालवृद्ध भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली आहे. मंदिरांमध्ये सकाळपासून विधिवत पूजा करण्यात आली. विठ्ठलाला फुले, तुळशीच्या माळा, हार, फळे आदी अर्पण करण्यात आले. विठ्ठल-रुक्मिणीची आकर्षक वेशभूषा करून दागिन्यांसह सजावट केल्याने साजिरे रूपाचे भाविकांनी डोळे भरून दर्शन घेतले. गाभाऱ्यातही भरगच्च फुलांची सजावट करण्यात आली होती. जुन्या तांबट लेन परिसरातील विठ्ठल मंदिरात विशेष सजावट करण्यात आली होती. तुलसीदल व तुळशीच्या माळा देवाला अर्पण केल्या. पायले कुटुंबाच्या वतीने आकर्षक वस्त्रजोडी अर्पण करण्यात आली. दिवसभर भाविकांनी खिचडी, भगर, कालवण, रताळ्याच्या चकल्या, केळी, सफरचंद आदी फळांसह उपवास केला. मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये ठिकठिकाणी भाविकांनी उपाहारगृहे, फास्टफूड सेंटर आदी ठिकाणी उपवासाची जिलेबी, गुलाबजाम, खीर, मिठाई, साबुदाणा वडा, उपवासाची कचोरी, फ्रुट सलाड आदींचा आस्वाद घेतला.  आषाढी एकादशीनिमित्त शहरातील कौमुदीप्रेरित महिला संघाच्या वतीने महिलांनी दिंडीचे आयोजन केले होते. प्रारंभी कौमुदी परिवाराच्या वतीने नामदेव विठ्ठल मंदिरात आरती करण्यात आली.शहरातील कापड बाजारातील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजाच्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले.उपनगर परिसरातील शांतीनगर विठ्ठल मंदिरात बागेश्रीनिर्मित ‘कानडा राजा पंढरीचा’ हा अभंग गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.नाशिकरोड येथे ‘विठ्ठल.. विठ्ठल.. विठ्ठला.., पांडुरंग विठ्ठला’च्या जयघोषामध्ये परिसरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी