शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘पुरुषोत्तम’च्या माजी विद्यार्थ्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:49 IST

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमधील १९६८-६९ च्या माजी विद्यार्थांचा स्नेहमीलनाचा मेळावा पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये संपन्न झाला. शाळेच्या अनेक आठवणींना यावेळी विद्यार्थ्यांनी उजाळा दिला.

नाशिक : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमधील १९६८-६९ च्या माजी विद्यार्थांचा स्नेहमीलनाचा मेळावापुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये संपन्न झाला. शाळेच्या अनेक आठवणींना यावेळी विद्यार्थ्यांनी उजाळा दिला.  सुरु वातीला शाळा भरल्याची घंटा वाजवून प्रतिज्ञा व प्रार्थना झाली. यानंतर दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दिलीप दातीर, अरविंद, राजलक्ष्मी रामन, माधुरी जोशी, नीलिमा गोखले, डॉ. भास्कर पाटील, ज्ञानेश्वर गायकवाड, सनदी लेखापाल मुकुंद कोकीळ या माजी विद्यार्थांनी शाळेच्या संस्कारामुळे आम्ही घडलो, असे सांगून स्वत:ची ओळख शोधण्यास मदत झाली आहे. या शाळेने आत्मविश्वास दिला असून, मराठी माध्यमातून शिक्षण घेऊनही उत्तम करिअर करता येते याचा अभिमान वाटतो, असे सांगितले.यावेळी माजी विद्यार्थी नंदन रहाणे यांनीही मनोगत व्यक्त केले. यानंतर शाळेचे प्राचार्य प्र. ला. ठोके यांनी शाळेबाबत माहिती दिली. शाळेचे माजी विद्यार्थी हे शाळेची खरी संपत्ती असल्याचे ते म्हणाले. तर संस्थेचे कार्यकारी मंडळाचे सदस्य मधुकर जगताप यांनी संस्थेच्या शतक महोत्सवाच्या संपन्न झालेल्या कार्यक्रमाबाबत माहिती दिली. यावेळी शाळेचे शिक्षक सुभाष पवार, भरत भालेराव, नितीन भांड, ज्ञानेश्वर रंधे, ज्ञानेश्वर डंबाळे, अंबादास नागपुरे, रु पाली झोडगेकर, विलास सोनार आदी उपस्थित होते.आठवणींमध्ये रममाणमेळाव्यास बंगळुरू, पुणे, मुंबई, रत्नागिरी या ठिकाणांहून बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सर्व विद्यार्थी साधारण ६५-६६ वयोगटातील होते मात्र पन्नास वर्षांनंतर प्रथमच भेटत असूनही हे विद्यार्थी एकमेकांना पूर्ण नावाने ओळख देत होते. सध्या बंगळुरूमध्ये स्थायिक असलेल्या राजलक्ष्मी रामन नाशिकमधील मुकुंद कोकीळ, प्रतिभा तुळापूरकर, सुधीर महाजन यांच्या पुढाकाराने सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र करण्यात आले. विविध पदांवरून सेवानिवृत्त झालेले सध्या व्यवसायात असलेले हे विद्यार्थी शाळेत आल्यावर भारावून गेले व आठवणींमध्ये रममाण झाले.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी