शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विश्वकर्मा पालखी मिरवणुकीने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 01:36 IST

शहरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. सोमवारी (दि.२९) सोमवार पेठेमधील श्री विश्वकर्मा मंदिर ट्रस्टच्या वतीने सकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये सहभागी चित्ररथ मुख्य आकर्षण ठरले.

नाशिक : शहरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. सोमवारी (दि.२९) सोमवार पेठेमधील श्री विश्वकर्मा मंदिर ट्रस्टच्या वतीने सकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये सहभागी चित्ररथ मुख्य आकर्षण ठरले.  विश्वकर्मा जयंतीनिमित्त विश्वकर्मा मंदिरापासून पालखी मिरवणुकीला सकाळी साडेनऊ वाजता प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अर्चना थोरात, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष विलास सूर्यवंशी यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मंदिराचे अध्यक्ष बाळकृष्ण दिघे, दशरथ शिरसाठ, निवृत्ती बोराडे, सुनीता जगताप, प्रज्ञा भालेराव यांसह समाजबांधव उपस्थित होते. टाळ-मृदंगाच्या गजरात मंदिरापासून निघालेली मिरवणूक तिवंधा चौक, मेनरोड, रविवार कारंजा, बोहरपट्टी, सराफ बाजारातून मार्गस्थ होत गोदाकाठावरून नेहरू चौकमार्गे विश्वकर्मा मंदिराजवळ पोहचली. येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. मिरवणुकीत ‘विश्वकर्मांची किमया, मान्यकरी सारी दुनिया’, ‘बोलो जय विश्वकर्मा’, ‘नवीन पर्व, विश्वकर्मा सर्व’, ‘नाही एक जातीधर्माचा, विश्वकर्मा भूतलावरील सर्वांचा’ अशा विविध घोषवाक्यांचे फलक यावेळी समाजबांधवांनी झळकविले. आरतीने दुमदुमले मंदिर‘जयदेव जयदेव जय विश्वकर्मा, निर्माण केले त्वा अखिल विश्वा... पंचमुख असती कर ते दहा, करि आयुधे ती शोभती पहा...’ या आरतीने मंदिराचा परिसर दुमदुमून गेला होता. मिरवणुकीच्या प्रारंभी पालखीचे पूजन व महाआरतीचे पठण विलास सूर्यवंशी व शैला सूर्यवंशी या दाम्पत्यांनी केले. यावेळी सामूहिकरीत्या उपस्थित समाजबांधवांनी त्यांच्यासोबत आरतीचे पठण केले.

टॅग्स :Nashikनाशिक