इगतपुरी : तालुक्यातील खैरे ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत इगतपुरी तहसील विभाग व निवडणूक विभागाने ग्रामस्थांची समजूत काढून बहिष्कार मागे घेण्याची विनंती केली. मात्र ग्रामस्थांनी आपला बहिष्कार कायम ठेवला. तालुक्यातील अनेक ठिकाणी मतदारांचे आॅनलाइन नावे मतदार यादीत असताना मात्र त्यांची नावे मतदान केंद्रावर मिळून आली नसल्याने तसेच मतदार यादीत झालेल्या फोटोच्या आणि नावाच्या घोळामुळे अनेक मतदारांना मतदानाचा हक्क बाजविता न आल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला.
खैरे ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
By admin | Updated: February 21, 2017 23:42 IST