शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मखमलाबादला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 01:38 IST

तुला मैत्रिणीने बोलावले... असे सांगत संशयित नराधमाने एका १३ वर्षीय मुलीला मखमलाबाद येथील शांतीनगरमध्ये स्वत:च्या घरात घेऊन जात तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली.

ठळक मुद्देनराधमास अटक : पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी

नाशिक : तुला मैत्रिणीने बोलावले... असे सांगत संशयित नराधमाने एका १३ वर्षीय मुलीला मखमलाबाद येथील शांतीनगरमध्ये स्वत:च्या घरात घेऊन जात तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली.या प्रकरणी पोलिसांनी संशयित बाजीराव सांगळे यास अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. शहरात आठवडाभरानंतर ही दुसरी घटना घडली आहे. हैदराबाद, उन्नाव येथील महिला अत्याचाराच्या घटनांनी देश हादरला असताना शहरातदेखील अशाच घटना घडत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच एका बालिकेवर नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित नराधम पीडितेकडे गेला आणि त्याने ‘तुला मैत्रिणीने बोलाविले’ असे सांगून स्वत:च्या घरी घेऊन गेला. तेथे पीडित मुलीसोबत शारीरिक अत्याचार करण्यास सुरुवात केली असता पीडितेने त्यास रोखत प्रतिकार केला, मात्र संशयिताने ‘तू जर ओरडली तर तुला ठार मारून टाकेन’ अशी धमकी दिली.या घटनेनंतर पीडित मुलीने आपले घर गाठून मोठ्या धाडसाने पालकांना घडलेला प्रकार कथन केला. पीडितेच्या आईने म्हसरूळ पोलीस ठाण्यात मुलीसह धाव घेऊन संशयिताविरुद्ध फिर्याद दिली. म्हसरूळ पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ संशयित सांगळेविरुद्ध बलात्कारासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमानुसार (पोक्सो) गुन्हा नोंदविला. सांगळे हा विवाहित असून, तो काही महिन्यांपासून घरात एकटाच राहत असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. रविवारी संशयित सांगळे यास बेड्या ठोकून पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास म्हसरूळ पोलीस करत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार