सायखेडा : राज्य शासनाने लागू केलेल्या मिनी लॉकडाऊनचे अनेक नागरिकांनी उल्लंघन केल्याचे चित्र गोदाकाठ भागात पहायला मिळाले. दिवसभर बाजारपेठा बंद असूनही नागरिक रस्त्यावर फिरत असल्यामुळे लॉकडाऊन आहे की लोक जाणूनबुजून रस्त्यावर येतात असा प्रश्न निर्माण झाला आहे.गोदाकाठ भागात मागील चार दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. करंजगाव, चांदोरी, चापडगाव, औरंगपूर, म्हाळसाकोरे ही गावे प्रशासनाने या अगोदरच हाय प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. गावागावात प्रत्येक दिवसाला अनेक रुग्ण वाढत आहेत. काही गावांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर बैठक घेऊन जनता कर्फ्यू लागू केला आहे. मात्र, काही गावांनी शासनाने निश्चित केलेली आचारसंहिता देखील पायदळी तुडवली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.शासनाने अनेक व्यवसाय बंद असल्याचे घोषित करून देखील दुकानदार अर्धे शटर उघडून व्यवसाय करीत आहेत. तर काही ठिकाणी घरातच दुकान असल्यामुळे दोन्ही जोरात सुरू आहेत. बँका चालू असल्या तरी बँकेत कोणत्याही प्रकारचे नियम पाळले जात नाहीत. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसले नाही. काही ठिकाणी मास्कविना ग्राहक बँकेत दिसले. बँकेचा कोणताही कर्मचारी नियम पाळा असे सांगताना किंवा प्रवेश करणाऱ्या ग्राहकांना सॅनिटायझर फवारणी करताना दिसले नाहीत.सायखेडा येथील मेनरोडवर अनेक भाजी विक्रेते बसले आहेत. त्याठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. लोकांची नेहमीप्रमाणे गर्दी आहे. सायखेडा परिसरातील नागरिक मुख्य बाजारपेठ म्हणून सायखेडा येथे येतांना मात्र गर्दी करतात. त्याचे दुष्परिणाम स्थानिक लोकांना भोगावे लागतील अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.भेंडाळी, करंजगाव, चांदोरी, औरंगपूर या गावांनी स्वयंस्फूर्तीने सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पाळला आहे. या गावातील आरोग्य व्यवसाय सोडले तर सर्व व्यवसाय बंद ठेवले आहेत.इतर गावातील नागरिक कठोर निर्णय घ्यावा, लॉकडाऊन कडकडीत पाळून संसर्गाची साखळी तोडावी अशी मागणी करीत आहेत.कोट...भेंडाळी ग्रामपंचायत स्तरावर शासन निर्णय होण्याच्या अगोदर कडकडीत गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दवाखाना आणि मेडिकल सोडली तर सर्व व्यवसाय स्वयंस्फूर्तीने बंद केले आहेत. सहा दिवस गाव बंद असल्यामुळे संसर्गाची साखळी तुटेल अशी अपेक्षा आहे. नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.- भारती खालकर,सरपंच भेंडाळी
गोदाकाठ भागात नागरिकांकडून उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 01:01 IST
सायखेडा : राज्य शासनाने लागू केलेल्या मिनी लॉकडाऊनचे अनेक नागरिकांनी उल्लंघन केल्याचे चित्र गोदाकाठ भागात पहायला मिळाले. दिवसभर बाजारपेठा बंद असूनही नागरिक रस्त्यावर फिरत असल्यामुळे लॉकडाऊन आहे की लोक जाणूनबुजून रस्त्यावर येतात असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गोदाकाठ भागात नागरिकांकडून उल्लंघन
ठळक मुद्देसायखेडा येथील मेनरोडवर अनेक भाजी विक्रेते बसले आहेत.