शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबक तालुक्यातील गावांना पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 00:57 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील मुलवड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाड्या-पाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. या गावांना तत्काळ पाणी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. दरम्यान, ६८५ कुटुंबांना जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येणार असून त्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे ग्रामविकास अधिकारी संजय आहेर यांनी सांगितले.

ठळक मुद्देगावांना ऐन टंचाई काळात पाणीपुरवठा करण्यात येईल.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील मुलवड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाड्या-पाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. या गावांना तत्काळ पाणी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. दरम्यान, ६८५ कुटुंबांना जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येणार असून त्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे ग्रामविकास अधिकारी संजय आहेर यांनी सांगितले.मुलवड ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वळण सावरीचा माळ, उंबरघोडा, घोटबारी, काकडवळण आदी गावांमध्ये डिसेंबर महिन्यातच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या गावातील पाणीटंचाई त्वरित दूर करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी आहेर यांना सिताराम चौधरी व त्यांच्या सहका-यांनी साकडे घातले आहे. तथापि, मुळवडचे ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ घाटाळ यांनी या गावांना पाणीटंचाई असल्याची कबूली देताना सांगितले, की अजून पाण्याचे स्त्रोत सहसा आटले नसले तरी ऐन रणरणत्या उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत झपाट्याने कमी होत गेले तर त्यावेळी काय करायचे असा प्रश्न उपस्थित केला. त्यापेक्षा सध्या या राखीव असलेल्या विहीरीवरुन पंपिंगद्वारे वळण चौरापाडा, काकडवळण, घोटबारी, उंबरघोडा आदी गावांना ऐन टंचाई काळात पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यामुळे तालुक्यात इतरत्र पाणीटंचाई भासत असल्यास दीड-दोन किलोमीटर परिसरातून पाणी आणून ती समस्या सोडविता येते, असेही परस्परविरोधी सूर ऐकावयास मिळत आहेत.प्रत्येक गावात पाण्याचे स्त्रोत आहेत, परंतु वास्तवात टंचाई परिस्थिती नाही. मात्र मार्च, एप्रिल, मे व जूनमध्ये टंचाई भासेल तेव्हा मुलवड वळण रस्त्यावरील विहीरीवर १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पाईपलाईन टाकून मोटारद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आम्ही ठरविले आहे. आताच या विहीरीचा उपसा केला तर खरोखरच्या टंचाई काळात पाणी कुठून आणायचे?- संजय आहेर, ग्रामविकास अधिकारी

टॅग्स :water shortageपाणीकपातgram panchayatग्राम पंचायत