शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
4
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
5
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
6
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
7
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
8
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
9
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
10
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
11
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
12
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
13
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
14
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
15
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
16
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
17
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
18
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
19
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी गावाचा संयुक्त प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 00:47 IST

पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत, तर संचारबंदी आणि उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीत देखील गावाचा कारभार हाकणारे गावकारभारी ग्रामस्थांच्या प्रकृतीसाठी गावाच्या सुख-दुःखात सामिल होऊन आपली जबाबदारी पार पाडत आहेत.

ठळक मुद्देलक्षण आढळल्यास त्या रुग्णांना विलगिकरण कक्षात हलवले जात आहे.

पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत, तर संचारबंदी आणि उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीत देखील गावाचा कारभार हाकणारे गावकारभारी ग्रामस्थांच्या प्रकृतीसाठी गावाच्या सुख-दुःखात सामिल होऊन आपली जबाबदारी पार पाडत आहेत.ग्रामीण भागात वाढत असलेला कोरोना संसर्ग रोखण्यासह लसीकरण वाढवण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार ग्राम दक्षता समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. त्यात गावचे सरपंच या समितीचे अध्यक्ष आहे, त्यामुळे कोरोनाचा गावात प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आणि कोरोनाला हद्दपार करण्यासाठी ग्रामपंचायतच्या गाव कारभाऱ्यांनी कंबर कसली आहे. त्यात अनेक गावे स्वतः बंद ठेवून जनता कर्फ्यू पाळले जात आहे. त्यात सरपंचांच्या पुढाकाराने ग्राम रक्षक, कुटुंब रक्षक, समाज रक्षक आदी मनापासून काम करीत आहेत. तसेच गावातील सामाजिक कार्यकर्त्यांना व तरुणांना संपर्क करून गावात कोणीही कोरोना बाधित होऊ नये यासाठी मदत कार्य सुरू केले आहे.माझें कुटुंब माझी जबाबदारी हे अभिनव उपक्रम राबवून गावातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी अंगणवाडी सेविका मदतनीस जिल्हा परिषद शिक्षक, कर्मचारी यांना मार्गदर्शन करून त्यांना सर्वेक्षनासाठी लागणारे साहित्य ग्रामपंचायतीला पुरवले जात आहे.शिवाय कोरोनाचे लक्षण आढळल्यास त्या रुग्णांना विलगिकरण कक्षात हलवले जात आहे.

गावात विलगीकरण कक्ष...कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कोरोना मुक्त गाव अभियानांतर्गत मुखेड ग्रामपंचायत मार्फत गावाच्या बाहेर १०० मीटरवर असलेल्या जिल्हा परिषद शाळेत सुरक्षिततेच्या दृष्टीने विलगीकरण कक्ष उभारण्यात आला असून त्याठिकाणी स्वतंत्र महिला कक्ष, पुरुष कक्ष त्यात टीव्ही फॅन, गादी, २४ तास लाईट, डसबिन, टॉयलेट आदी अत्यावश्यक त्यासुविधा दिल्या आहेत. यासाठी मुखेड ग्रामपंचायतचे सरपंच अमोल जाधव, उपसरपंच वृषाली पवार, लिलाबाई पाटील, प्रवीण जाधव, सागर शिंगाडे, शरद गायकवाड, अनिता गांगुर्डे, जयश्री नेहरे, छाया जाधव आदींसह ग्रामविकास अधिकारी कमलेश सावंत परिश्रम घेत आहेत. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतcorona virusकोरोना वायरस बातम्या