शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांनी वाचविले लांडग्याचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:47 IST

पाटोदा येथील शेतकरी भागवत पगारे यांच्या सुमारे ४० ते ४५ फूट खोल विहिरीत पडलेल्या लांडग्याला ग्रामस्थ व वनविभागाने केलेल्या शर्तीच्या प्रयत्नामुळे जीवदान मिळाले.

ठळक मुद्देपाटोद्यातील घटना : विहिरीतून बाहेर काढले

पाटोदा : येथील शेतकरी भागवत पगारे यांच्या सुमारे ४० ते ४५ फूट खोल विहिरीत पडलेल्या लांडग्याला ग्रामस्थ व वनविभागाने केलेल्या शर्तीच्या प्रयत्नामुळे जीवदान मिळाले.येथील भागवत पगारे हे सकाळी आठच्या सुमारास आपल्या विहिरीवर गेले असता त्यांना विहिरीत आवाज ऐकू आल्याने त्यांनी पाहिले असता विहिरीत लांडगा पडला असल्याचे निदर्शनास आले. लांडग्यास विहिरीतून बाहेर काढण्यासाठी लखन पगारे, भागवत पगारे, सखाराम पगारे यांनी प्रयत्न सुरू केले तसेच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांनाही माहिती दिली. ग्रामस्थांनी लांडग्याला बाहेर काढण्यासाठी खाटेला चार दोरांच्या साहाय्याने विहिरीत सोडले. मात्र त्यांना यश येत नव्हते. लांडगा हा पूर्णत: भेदरलेल्या अवस्थेत एका कपारीवर बसण्याचा प्रयत्न करीत होता. लांडगा वारंवार कपारीवरून पाण्यात पडत असल्याने पोहून पोहून दमलेला होता. वनविभागाचे कर्मचारी पिंजरा घेऊन आले. त्यांनी विहिरीत पिंजरा सोडून लांडग्यास बाहेर काढण्यासाठी अयशस्वी प्रयत्न केला. वनकर्मचारी जी.आर. हरगावकर, समाधान कदम यांनी आपला जीव धोक्यात घालून विहिरीत उतरत लांडग्यास विहिरीच्या बाहेर काढले. कठड्यावर येताच लांडग्याने हिसका देत धूम ठोकली.

टॅग्स :Nashikनाशिकwildlifeवन्यजीव