उस्मानाबाद : तालुक्यातील शिंगोली तांड्यावर सोमवारी रात्रीच्या सुमारास तुफान दगडफेक झाली असून, एका घरात घुसून घरातील मंडळींना मारहाण करण्यात आली़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता़शिंगोली तांडा येथे मागील दोन दिवसांपासून काही इसमांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली होती़ मात्र, त्यानंतर सोमवारी रात्रीच्या सुमारास अचानकच तांड्यावर दगडफेक सुरू झाली़ दोन्ही बाजूंनी दगडफेक होत असल्याने एकच गोंधळ उडाला. तर एका घरातील काही लोकांना घरात घुसून मारहाण झाल्याचे समजते़ मात्र, कोणत्या कारणावरून ही घटना घडली, हे रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही़ शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून धरपडक सुरू केली होती़ याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता़
ग्रामस्थांनी वाचला समस्यांचा पाढा
By admin | Updated: January 4, 2016 23:58 IST