शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

दरेवाडीचे ग्रामस्थ करणार मूळ जागेवर झेंडावंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 5:39 PM

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नव्याने झालेल्या भाम धरणाच्या परिसरातील प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या पुर्नवसनाच्या अडचणी अद्याप सोहविण्यात न आल्याने दरेवाडीच्या संतप्त प्रकल्पबाधितांनी २६ जोनेवरी रोजी सदरच्या मुळ जागेवर घषंडावंदन करण्याचा इरादा व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देइगतपुरी : प्रकल्पबाधितांचा पुर्नवसनाकरीता आक्र मक पवित्रा

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नव्याने झालेल्या भाम धरणाच्या परिसरातील प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या पुर्नवसनाच्या अडचणी अद्याप सोहविण्यात न आल्याने दरेवाडीच्या संतप्त प्रकल्पबाधितांनी २६ जोनेवरी रोजी सदरच्या मुळ जागेवर घषंडावंदन करण्याचा इरादा व्यक्त केला आहे.सदर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न नवीन वर्षात तरी सुटतील अशी आशा होती, मात्र इगतपुरी तालुका तहसील प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठवून डिसेंबर अखेर पर्यंत प्रश्न मार्गी लावू असे लेखी आश्वासन देऊनही अद्याप पुनर्वसनाच्या कुठल्याही हालचाली दिसत नसल्यामुळे संतप्त झालेल्या दरेवाडी ग्रामस्थानी प्रजासत्ताक दिनी आपल्या मूळ जागेत झेंडावंदन करून तिथेच पुन्हा राहण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन ग्रामस्थानी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुनर्वसन अधिकारी, इगतपुरी तहसीलदार व पोलीस प्रशासनाकडे दिले आहे. यामुळे पुन्हा एकदा भाम धरणग्रस्त नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.इगतपुरी तालुक्यातील काळूस्ते येथे पंतप्रधान सिंचन योजनेतून सुमारे अडीच टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणाच्या प्रारंभीपासून येथील प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचा मूळ प्रश्न शासनाकडून सोडविण्यात आलेला नाही. या धरणामुळे संपूर्ण दरेवाडी बाधित होऊन ग्रामस्थांची शंभर टक्के घरे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे प्रशासनाने या नागरिकांना तात्पुरते शेड उभारून कसे बसे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला असला तरी तो दरेवाडीकरांना मान्य नाही.नवीन हक्काच्या जागेत कायमस्वरूपी सर्व सोयीसुविधायुक्त जागेत पुनर्वसन करण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा शासनाकडे आपली कैफियत मांडली. कित्येकदा अर्ज, विनंत्या ही करण्यात आल्या मात्र कुणीही दखल घेतली नाही. म्हणून गेल्या १० डिसेंबर रोजी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून इगतपुरीच्या तहसील कार्यालयावर संतप्त प्रकल्पबाधित नागरिकांनी आपला बिºहाड मोर्चा काढून मूळ मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी तहसीलदार वंदना खरमाळे व संबंधित अधिकारी यांनी लेखी उत्तर देऊन डिसेंबर अखेर शासनाकडे प्रस्ताव पाठवून प्रकल्पबाधितांचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.मात्र जानेवारीचा पंधरवाडा उलटून गेला तरी कसलीही दाद मिळत नसल्याचे बघून पुनर्वसनाची आस लावून बसलेल्या बाधित दरेवाडीकरांवर शासनाच्या व प्रशासनाच्या नाकर्ते पणामुळे पून्हा आपल्या मूळ जागेवर राहण्याची वेळ आली आहे. या मूळ ठिकाणी तुटलेली घरे, पडलेल्या भीती व पाणी असून जर या ठिकाणी काही बरेवाईट घडून धोका निर्माण झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील असा इशारा निवेदनात देण्यात आलेला आहे. यामुळे इगतपुरी प्रशासनाची धावपळ उडाली आहे.या निवेदनावर शांताराम भगत, सीताराम गावंडा, बाळू गावंडा, अरु ण गावंडा, गणपत गावंडा, साईनाथ गावंडा, यशवंत पारधी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.----------------शासनाने या धरणाची निर्मिती करतेवेळी प्रकल्पात गेलेल्या आदिवासी नागरीकांच्या जमिनीचा मोबदला देण्यात कसर केली आहे. अशी नागरिकांची तक्र ार आहे. शिवाय गत वर्षी भाम धरणात प्रथमच पाणी साठवले गेले. पुनर्वसनाच्या अटी शर्थी पूर्णपणे शसनाकडून पाळल्या गेल्याच नाही तर मग अधिकारी लोकांनी पाणी साठा करण्याची घाई का केली? असा सवाल उपस्थित झाला आहे.प्रथम र्पुावसन मगच पाणी हे धोरण शासनाकडून पाळण्यात आलेले नाही. संपूर्ण दरेवाडी बाधित असतांना पावसाळ्यात नागरिकांना गळक्या शेडमध्ये रहावे लागलेले आहे.----------------निवेदनाची प्रत. (फोटो १७ निवेदन)