शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

चंदनचोरांना रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:19 IST

देवळाली कॅम्प परिसरात चंदन झाडाची चोरी करणाऱ्या आरोपींना देवळाली कॅम्प पोलिसांच्या गस्ती पथकाने शिताफीने ताब्यात घेत त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला.

देवळाली कॅम्प : देवळाली कॅम्प परिसरात चंदन झाडाची चोरी करणाऱ्या आरोपींना देवळाली कॅम्प पोलिसांच्या गस्ती पथकाने शिताफीने ताब्यात घेत त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला.गेल्या काही महिन्यांपासून नागरी वस्तीसह लष्करी हद्दीत चंदनचोरांनी धुमाकूळ घातला होता. पोलीस त्यांच्या मागावर असतानाच भगूर परिसरात तीन इसम एक चंदनाचे झाड तोडत असताना बीट मार्शल अनिल आहेर यांनी बॅटरीच्या प्रकाशात तिघांना हटकले असता ते पळू लागले. अंधाराचा फायदा घेत दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र बाळू भानुदास पवार (रा. पिंपळगाव, ता. संगमनेर) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याने साथीदार बारकू दुधवडे (रा. देसावडे, ता. पारनेर) व संजय रमेश सूर्यवंशी (रा. चिखली, ता. संगमनेर) अशी नावे सांगितली. तसेच तोडलेले चंदनाचे झाडे संजय किसन डोके (रा. साकूर, ता. संगमनेर) यांना देत असल्याचे सांगितले. फरार चोरटे व माल घेणारा यांच्या शोधासाठी गुन्हे शोध पथक नगर येथे गेले असता धारगाव पोलिसांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले. सदर आरोपींकडून माहिती घेतली असता भानुदास पवार याचे नातेवाईक पोपट रत्नाकर बर्डे (रा. लहवित) हा आरोपींना चंदनाची झाडे कोठे आहे याची माहिती देत असल्याचे निष्पन्न झाले.यापूर्वी लष्करी रुग्णालय व परिसरातील चंदनाची झाडे तोडल्याचे त्यांनी कबूल करत बर्डे याच्याकडे लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून बाळू पवार, संजय सूर्यवंशी, पोपट बर्डे यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून करवत, मोटारसायकल व चंदनाचे लाकूड जप्त केले आहे. सदरची कारवाई पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहायक पोलीस आयुक्त ईश्वर वसावे, वपोनि देवीदास वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ए. आर. जाधव, मुठाळ, अनिल आहेर, श्याम कोटमे, सुदाम झाडे, सुभाष जाधव आदींनी पार पाडली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी