कळवण : तालुक्यातील शेतकरी बांधवाना व वीज ग्राहकांना वाढीव वीज बिल न देता नियमित बिल द्यावे, वाढीव बिले भरली जाणार नाही याची दखल महावितरणने घ्यावी, अखंड व सुरळीत वीज पुरवठा देण्यासाठी उपाययोजना करावी, वीज ग्राहकांच्या गावनिहाय तक्र ारी सोमवारपासून जाणून घेऊन त्यांची सोडवणूक करावी अशी सूचना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांची महावितरणच्या यंत्रणेला केली.चणकापूर परिसरातील वीज ग्राहकांच्या तक्र ारींचे निवारण करण्यासाठी चणकापूर येथे महावितरण व शेतकरी बांधवांची संयुक्त बैठक पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.जुन ते सप्टेंबर पासून मोटार बंद, घरात फ्रिज, फॅन नाही तरीही तिप्पट बिल, रिडींग घेऊन बिल द्या, सरासरी बिल देऊ नका, मीटर नाही तरी बिल आले, विहिरी कोरडी तरी लाख रु पये बिल, मोटर कमी असतांना जास्त मोटरचे बिल, चणकापूरमार्ग कनाशीकडे वीज लाईन जाऊ देऊ नका, सुमारे४५वर्षांपासून परिसरातील वीज तारा बदलल्या नाही अशा अनेक तक्र ारी जयश्री पवार यांच्या समोर मांडल्या.यावेळी पंचायत समितीचे उपसभापती विजय शिरसाठ, माजी सभापती आशा पवार, जगन साबळे, ज्ञानदेव पवार, मनोहर ठाकरे, भिवा बागुल, प्रभू बागुल, उग्रवाल चव्हाण, राजू पाटील, रामदास चव्हाण आदींनी तक्र ारी नोंदवल्या.तालुक्यात सोमवारपासून गावनिहायवीज ग्राहकांच्या तक्र ारी जाणून घेऊन वीज बिल व सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणार असल्याची ग्वाही महावितरणच्या यंत्रणेने यावेळी दिली.बैठकीत गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम यांनी यावेळी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या शासनाच्या उपक्र माची माहिती दिली. बैठकीला चणकापूर, देसगाव, बोरदैवत परिसरातील शेतकरी, सरपंच, सोसायटीचेचेअरमन, पोलीस पाटील, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कळवण तालुक्यात वीज ग्राहकांच्या गावनिहाय तक्र ारीची दखल घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 14:57 IST
कळवण : तालुक्यातील शेतकरी बांधवाना व वीज ग्राहकांना वाढीव वीज बिल न देता नियमित बिल द्यावे, वाढीव बिले भरली जाणार नाही याची दखल महावितरणने घ्यावी, अखंड व सुरळीत वीज पुरवठा देण्यासाठी उपाययोजना करावी, वीज ग्राहकांच्या गावनिहाय तक्र ारी सोमवारपासून जाणून घेऊन त्यांची सोडवणूक करावी अशी सूचना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांची महावितरणच्या यंत्रणेला केली.
कळवण तालुक्यात वीज ग्राहकांच्या गावनिहाय तक्र ारीची दखल घेणार
ठळक मुद्देसोमवारपासून उपाययोजना करणार असल्याची महावितरची ग्वाही तक्र ारी