तरसाळी : महिला बालकल्याण केंद्राअंतर्गत औंदाणे, कौतिकपाडे, यशवंतनगर,तरसाळी येथील अंगणवाड्यामध्ये कुपोषित व अतिकोपोषित बालकांनसाठी ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आले आहेत. अंगणवाड्यामध्ये कुपोषित व अतिकुपोषित बालके आढळून आले असल्यामुळे त्यांचा शारीरिक विकास व्हावा त्याअनुषंगाने महिला बाल विकास केंद्राअंतर्गत अंगणवाड्यामध्ये ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात आले आहेत.या केंद्राच्या माध्यमातून कुपोषित बालकांना दिवसभरात अमायलेजनयुक्त पिठाचे अन्न, अंडी, केळी, बालकोपरा तसेच आरोग्य विभागाकडून औषधे देण्यात येणार आहेत. मिहनाभर ही केंद्र सुरू राहणार असल्याची माहिती मुख्य सेविका संगिता घोलप यांनी दिली.यावेळी ग्रामपंचायत सरपंच वैशाली मोहन, ग्रामपंचायत सदस्य लखन पवार, ग्रामसेवक एन. एम. देवरे, अरु ण मोहन, जगदीश रौंदळ, कमल गांगुर्डे, अंगणवाडी सेविका सुमन रौंदळ, पुंडलिक जाधव उपस्थित होते.
कुपोषित, अतिकोपोषित बालकांसाठी ग्राम बालविकास केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:29 IST
तरसाळी : महिला बालकल्याण केंद्राअंतर्गत औंदाणे, कौतिकपाडे, यशवंतनगर,तरसाळी येथील अंगणवाड्यामध्ये कुपोषित व अतिकोपोषित बालकांनसाठी ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात ...
कुपोषित, अतिकोपोषित बालकांसाठी ग्राम बालविकास केंद्र सुरू
ठळक मुद्देआरोग्य विभागाकडून औषधे देण्यात येणार आहेत.