शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

प्रभाग ३० मध्ये ४२ कॅमेऱ्यांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 00:53 IST

महापालिका हद्दीतील एकूण प्रभागांपैकी इंदिरानगर भागातील प्रभाग ३०चा सुमारे ९५ टक्के भाग सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेखाली आला आहे. या प्रभागातील प्रत्येक चौकात युनिक ग्रुपच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने ४२ कॅमेºयांची प्रभागावर सूक्ष्म नजर असणार आहे.

इंदिरानगर : महापालिका हद्दीतील एकूण प्रभागांपैकी इंदिरानगर भागातील प्रभाग ३०चा सुमारे ९५ टक्के भाग सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेखाली आला आहे. या प्रभागातील प्रत्येक चौकात युनिक ग्रुपच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने ४२ कॅमेºयांची प्रभागावर सूक्ष्म नजर असणार आहे. राजीवनगर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयांचे उद्घाटन वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात दोन व परिसरातील रस्त्यावर चार असे एकूण सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. परिसरात होणाºया घरफोड्या, सोनसाखळी चोरी आणि टवाळखोरीसह गुन्हेगारीस आळा बसण्यासाठी परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार प्रभागाचे सभागृहनेता सतीश सोनवणे यांच्या सहकार्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. त्यामुळे प्रभागातील प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसण्यात आल्याने ९५ टक्के प्रभाग सीसीटीव्हीच्या नजरेखाली आला आहे. त्यामुळे अनेक वेळेस गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेºयांची मदत झाली आहे. यावेळी व्यासपीठावर आरोग्य सभापती दीपाली कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी, उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे उपस्थित होते. याप्रसंगी दत्तात्रेय पाळदे, सागर कोळी, अनिकेत सोनवणे, अनिल जाचक, सागर पाटील, कैलास देवांग यांसह नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन किशोर शिरसाठ यांनी केले.या चौकात सीसीटीव्हीभगवती चौक, राणेनगर चौफुली, लालबाग चौक, पांडव नगरी, कैलासनगर बस थांबा, कमोदनगर, चार्वाक चौक, राजीव टाउनशिप, नगरसेवक संपर्क कार्यालय परिसर.प्रभाग भयमुक्त करण्याचे दिलेले आश्वासन टप्प्याटप्प्याने चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून पूर्ण करीत आहे. सीसीटीव्ही कॅमेºयांमुळे अनेक गुन्हे उघडीस येण्यास मदतच झाली असून, गुन्हेगारीस आळा बसला आहे.- सतीश सोनवणे, सभागृह नेता

टॅग्स :cctvसीसीटीव्हीNashikनाशिक