शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

विजयानंतरच आले महायुतीचे उमेदवार जल्लोष निकालाचा : गोडसेंसाठी सज्ज रथ

By admin | Updated: May 17, 2014 00:42 IST

नाशिक : लोकसभा निवडणुकीत सुरुवातीपासून महायुतीच्या उमेदवारांना अनुकूल वातावरण जाणवत असले तरी सेनेचे हेमंत गोडसे आणि भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण हे निकाल संपेपर्यंत मतमोजणीच्या ठिकाणी आले नव्हते. छगन भुजबळ, डॉ. प्रदीप पवार यांच्यासह अन्य अनेक उमेदवार तर अखेरपर्यंत फिरकलेही नाहीत.

नाशिक : लोकसभा निवडणुकीत सुरुवातीपासून महायुतीच्या उमेदवारांना अनुकूल वातावरण जाणवत असले तरी सेनेचे हेमंत गोडसे आणि भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण हे निकाल संपेपर्यंत मतमोजणीच्या ठिकाणी आले नव्हते. छगन भुजबळ, डॉ. प्रदीप पवार यांच्यासह अन्य अनेक उमेदवार तर अखेरपर्यंत फिरकलेही नाहीत.लोकसभा निवडणुकीच्या निकालाविषयी जनसामान्य आणि कार्यकर्त्यांतही उत्सुकता होती. सकाळी आठ वाजता मतमोजणी कर्मचार्‍यांना गोपनीयतेची शपथ दिली गेली. त्यानंतर टपाली मते मोजण्यात आली आणि त्यानंतर मुख्य मतमोजणीला प्रारंभ झाला. अनेक वेळा मतमोजणीस उमेदवार उपस्थित राहतात किंवा कित्येकदा मतमोजणीतील कौल बघून मतदान केंद्रांत दाखल होत असतात. आज मात्र कौल आपल्या बाजूने दिसत असतानादेखील हेमंत गोडसे आणि हरिश्चंद्र चव्हाण केंद्रात आले नाहीत. नाशिकपेक्षा दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा निकाल लवकर जाहीर झाला. परंतु दीड वाजेच्या सुमारास खासदार चव्हाण दाखल झाले. त्यांच्यासमवेत भाजपाचे संघटन मंत्री डॉ. राजेंद्र फडके, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, तसेच सुरेश पाटील, गोपाळ पाटील असे अनेक पदाधिकारी होते. त्यानंतर हेमंत गोडसे यांचे आगमन झाले. त्यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, ॲड. शिवाजी सहाणे यांच्यासह अन्य पदाधिकार उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी विजयी उमेदवार म्हणून प्रमाणपत्र स्वीकारले. अन्य उमेदवारांमध्ये माकपाचे ॲड. तानाजी जायभावे आणि हेमंत वाघेरे हे देखील उपस्थित होते. राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, मनसेचे डॉ. प्रदीप पवार, बसपाचे दिनकर पाटील आणि आपचे विजय पांढरे, तसेच दिंडोरी मतदारसंघातील डॉ. भारती पवार हे उमेदवार फिरकलेही नाहीत.निकालानंतर येणार्‍या गोडसे यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी थेट विजयी रथच मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी आणला होता. कार्यकर्ते जल्लोषासाठी येत असताना मोटारींवर शिवसेनेचे भगवे ध्वज घेऊन येत होते. मतदान केंद्रांकडे जाणार्‍या मार्गांवरच गुलाल उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.