नाशिक : राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीवर गठीत केलेल्या उच्चाधिकार समितीने रविवारी (दि.११) अल्पभूधारकांना कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला असून, हा शेतकरी संपासाठी नाशिकमधून पुकारलेल्या लढ्याचा ऐतिहासिक विजय मानला जात आहे; मात्र या चर्चेत शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव, बाजार व्यवस्था, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी व शेतकऱ्यांना ६० वर्षांनंतर कर्जमुक्ती यासह सरसकट कर्जमुक्ती या विषयांवर कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याची प्रतिक्रिया चर्चेवर बहिष्कार टाकणाऱ्या सुकाणू समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे.
नाशकात फटाके फोडून विजयोत्सव
By admin | Updated: June 12, 2017 00:13 IST