शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिकता आणि अंधश्रद्धेचा ‘बळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:44 IST

आधुनिकतेच्या काळात माहिती-तंत्रज्ञानाच्या गोष्टी जरी केल्या जात असल्या तरी राज्यातील बहुतांश खेड्यापाड्यांत आजही अंधश्रद्धेला वाव मिळत आहे. अंधश्रध्देची खोलवर रूजलेली पाळेमुळे उखडून फेकण्यास अद्यापही अपयश येत असून, यामुळे मानवी जीवन उद्ध्वस्त होत असले तरी त्याकडे फ ारसे लक्ष देण्यास कुणीही तयार नाही, यावर रंगमंचावरून ‘बळी’च्या प्रयोगाद्वारे प्रकाश टाकला गेला.

नाशिक : आधुनिकतेच्या काळात माहिती-तंत्रज्ञानाच्या गोष्टी जरी केल्या जात असल्या तरी राज्यातील बहुतांश खेड्यापाड्यांत आजही अंधश्रद्धेला वाव मिळत आहे. अंधश्रध्देची खोलवर रूजलेली पाळेमुळे उखडून फेकण्यास अद्यापही अपयश येत असून, यामुळे मानवी जीवन उद्ध्वस्त होत असले तरी त्याकडे फ ारसे लक्ष देण्यास कुणीही तयार नाही, यावर रंगमंचावरून ‘बळी’च्या प्रयोगाद्वारे प्रकाश टाकला गेला.  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाशिक विभागाच्या वतीने आयोजित नाट्यमहोत्सवातील प्राथमिक स्पर्धेत मंगळवारी ललित कला भवन, जळगाव, मेहरुण वसाहतच्या वतीने ‘बळी’ या नाटकाचा प्रयोग परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सादर करण्यात आला.  सत्य घटनेवर आधारित या नाटकाच्या कथानकातून अंधश्रद्धेचा बळी ठरणारी ग्रामीण जनता आणि अंधश्रद्धेविषयीची जनजागृती या विषयाला धरून कथा सादर करण्यात आली. पारंपरिक बुरसटलेली विचारसरणी, निरक्षरता आणि त्याचा आजच्या पिढीवर होणारा परिणाम यामुळे एका सामान्य कुटुंबाची होणारी घुसमट या नाटकात दाखविण्यात आली. रुपाली गुंगे लिखित व बापूराव गुंगे दिग्दर्शित या नाटकात निशा पाटील, जगदीश नेवे, मानसी नेवे, निखिल शिंदे, रेषा गुंगे, रत्ना ठाकरे, नीलेश रायपूरकर, योगेश हिवरकर, भूषण निकम, आनंद जोशी यांसह कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. — आजचे नाटक — डार्लिंग

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक