शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बाधितांनी एकाच दिवसात ओलांडला दीड हजारांचा टप्पा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 00:13 IST

नाशिक : कोरोना रुग्णांचा विस्फोट सलग चौथ्या दिवशीही कायम असून, शनिवारी (दि.१३) एका दिवसात तब्बल १,५२२ रुग्णबाधित आढळून आले आहेत. तब्बल दीड हजारांवर नवीन कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे.

ठळक मुद्देउपचारार्थी संख्या सात हजारांवर

नाशिक : कोरोना रुग्णांचा विस्फोट सलग चौथ्या दिवशीही कायम असून, शनिवारी (दि.१३) एका दिवसात तब्बल १,५२२ रुग्णबाधित आढळून आले आहेत. तब्बल दीड हजारांवर नवीन कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे.

६८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, नाशिक ग्रामीणमधून १, मालेगाव मनपा क्षेत्रातून १ असे एकूण २ बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या २,१६८ वर पोहोचली आहे.जिल्ह्यात शनिवारी बाधितांच्या आकड्याने गत सहा महिन्यांतील सर्वांत मोठी मजल गाठल्याने सर्व उपाययोजना अधिक कठोर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यात बुधवारी बाधितांचा आकडा १,३३०पर्यंत, गुरुवारी १,१४०पर्यंत, तर शुक्रवारी १,१३५वर गेल्याने कोरोनाचा ग्राफ कमी होण्याची शक्यता वाटू लागली. मात्र शनिवारी बाधित संख्या थेट १,५२२ वर पोहोचल्याने अजून बाधित संख्या किती प्रमाणात वाढेल, त्याचा अंदाज यंत्रणेलादेखील येईनासा झाला आहे. आरोग्य विभागासह प्रशासनावर चिंतेचे सावट पसरले आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात सलग चार दिवस बाधित आढळण्याची बाब चिंताजनक असल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीनेदेखील नागरिकांना आता कठोर इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख ३२ हजार २३४ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख २२ हजार ८४९ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या ७,२१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९२.९० वर आली आहे. त्यात नाशिक शहरात ९२.४३, नाशिक ग्रामीण ९४.७५, मालेगाव शहरात ८७.९८, तर जिल्हाबाह्य ९२.२२ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या पाच लाख ७६ हजार ८२१ असून, त्यातील चार लाख ४१ हजार ७६५ रुग्ण निगेटिव्ह, तर एक लाख ३२ हजार २३४ रुग्णबाधित आढळून आले आहेत, तर २,८२२ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.उपचारार्थी संख्या सात हजारांवरनवीन रुग्णसंख्येत झालेली मोठी वाढ झाल्याने महानगरातील उपचारार्थी रुग्णांची संख्या सात हजाराचा टप्पा ओलांडून गेली आहे. सलग चौथ्या दिवशी झालेल्या या वाढीमुळे. उपचारार्थी रुग्णसंख्या ७,२१७ वर पोहोचली आहे. त्यामुळे बाधितांचा इतक्या मोठ्या प्रमाणातील वाढता आकडा बघून जिल्हाभरातील बंद करण्यात आलेली अनेक कोरोना सेंटर्स, तपासणी केंद्रे पुन्हा सुरू करावी लागणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल