शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
2
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
3
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अंतरवाली सराटीतूनच विरोध, गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 
4
हिमाचल प्रदेशमध्ये ३ अपक्ष आमदारांचा राजीनामा मंजूर, आता या मतदारसंघात होणार पोटनिवडणूक
5
निकालाआधीच दिल्लीत हालचालींना वेग! नितीश कुमार यांनी पीएम मोदींची घेतली भेट, अमित शहा यांचीही भेट घेणार
6
शिवसेना तोडली, पण उद्धव ठाकरेंना संपवू शकले नाहीत; महाराष्ट्राचा एक्झिट पोल, भाजपाला सतावणारा
7
सर्वांनी माघार घेतली तर उमेदवार-नोटामध्ये निवडणूक का नाही? आयुक्त राजीव कुमारांनी केले स्पष्ट
8
Lipi Rastogi Suicide Note : मुंबईत आयएएस दाम्पत्याच्या मुलीची आत्महत्या, 'सुसाइड नोट'मध्ये काय? आलं समोर...
9
"आश्वासक बदल दिसला नाहीतर मी..."; CM शिंदेंचा उल्लेख करत शरद पवारांचा सरकारला इशारा
10
"कोणी केले सांगा, आम्ही त्यांना शिक्षा देऊ"; अमित शाह यांनी धमकावल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
11
भारतातल्या पहिल्या निवडणुकीच्या मास्टरमाईंडवर येतोय सिनेमा, विद्या बालनच्या पतीची मोठी घोषणा
12
विजयापूर्वीच जल्लोषाची तयारी, पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून भाजपा कार्यालयापर्यत होणार रोड शो  
13
पॉवर शेअर चमकला, सरकारचा आहे ५१ टक्के हिस्सा; १३ एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी करा, भाव वाढणार..."
14
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पुढील लोकसभा निवडणूक एप्रिलमध्येच संपविणार
15
“आमच्या नादाला लागू नका, उद्धव ठाकरे हे...”; रवी राणांच्या दाव्यावर संजय राऊतांचा पलटवार
16
"हातकणंगलेमधून मीच निवडून येणार"; निकालाआधीच राजू शेट्टींनी थेट लीडच सांगितलं
17
T20 World Cup मधील सर्वात तरूण आणि वयस्कर खेळाडू कोण? तब्बल २५ वर्षांचे अंतर
18
प्रेरणादायी! इंजिनिअर झाला वेटर, विकली चित्रपटाची तिकिटं; ६ वेळा नापास, ७ व्या प्रयत्नात IRS
19
Akasa Air च्या दिल्ली-मुंबई विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; अहमदाबादेत ईमर्जन्सी लँडिंग
20
Exit Poll मध्ये भाजप्रणित एनडीएला बहुमत; गुंतवणूकदारांच्या उड्या, Adani च्या शेअर्समध्ये तुफान तेजी

पोलिसांचा पाठलाग बेतला तरुणाच्या जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 11:23 PM

नाशिक : दुचाकीवरून ट्रिपलसीट जाणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केल्यानंतर दुचाकी भरधाव घेऊन जाताना भिंतीवर आदळून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली.

ठळक मुद्देदोन जखमी : भरधाव दुचाकी भिंतीवर आदळली

नाशिक : दुचाकीवरून ट्रिपलसीट जाणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केल्यानंतर दुचाकी भरधाव घेऊन जाताना भिंतीवर आदळून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली.गंगापूररोड भागात पाइपलाइन परिसरातून सकाळी ११ वाजेच्या सुमारास तरुण दुचाकीवरून ट्रिपल सीट जात असताना पोलिसांनीत्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचा पाठलाग टाळण्यासाठी तरुणांनी वेग वाढविल्याने दुचाकी काळेनगर जॉगिंग ट्रॅकच्या सुरक्षा भिंतीवर आदळल्याने तबरेज खान (१७)याचा मृत्यू झाला. तर नितीन जैस्वाल आणि सलमान सोहेलअली खान हे दोनजण जखमी झाले आहेत. पोलिसांवर आरोप घटनेची माहिती मिळाल्यानंतर सायंकाळी मृत व जखमी युवकांच्या नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत या घटनेस पोलीस जबाबदार असल्याचा आरोप करून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काहीकाळ तणावाचे वातारण निर्माण झाल्याने याठिकाणी सरकारवाडा पोलिसांसह शीघ्रकृती दलाचे जवानही तैनात करण्यात आले होते.