शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
2
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
4
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
5
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
6
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
7
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
8
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
9
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 
10
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
11
भारताने जगाला स्वतःची कहाणी प्रभावीपणे सांगावी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आवाहन
12
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
13
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
15
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
16
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
17
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
18
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
19
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
20
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान

२५०० बोकडांचा बळी

By admin | Updated: February 11, 2017 00:41 IST

म्हाळोबा यात्रा : ७० हजार भाविकांनी घेतले दर्शन

नांदूरशिंगोटे : धनगर समाजाचे कुलदैवत असलेल्या व दोडी परिसराचे ग्रामदैवत म्हाळोबा महाराज यात्रेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी नवसपूर्तीसाठी सुमारे अडीच हजाराहून अधिक बोकडांचा बळी देण्यात आला. दिवसभरात सुमारे ७० हजार भाविकांनी दर्शन घेतले. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात येत आहेत. दरवर्षी माघ पोर्णिमेस म्हाळोबा महाराजांची यात्रा भरते. नवसपूर्तीसाठी भाविक मोठ्या प्रमाणात बोकडबळी देतात. यावर्षी वधगृहातच बोकडबळी दिल्याने उघड्यावर बोकडबळी रोखण्यात यात्रा समिती व पोलीस प्रशासनाला यश मिळाल्याचे दिसून आले. आज यात्रेच्या दुसऱ्या दिवशी पहाटे भक्तगणांच्या हस्ते म्हाळोबाची महापूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळपासून वधगृहात बोकडबळी देण्यास प्रारंभ झाला. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी भाविकांची गर्दी मोठी गर्दी होती. मंदिराच्या शंभर फूट चारही बाजूंनी बॅरिकेटस उभारून दर्शन रांगा तयार करण्यात आल्या आहेत. यात्रेच्या शेवटच्या दिवशी शनिवारी स्थानिक भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होण्याची शक्यता असून भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यात्रा समितीने केले आहे.नवसपूर्तीसाठी भाविकांकडून बोकळबळी दिल्यानंतर भाविक व मित्र परिवार भोजनाचा आस्वाद घेतांना दिसत होते. महिलांकडून नवसपूर्तीसाठी दिवसभर लोटांगण घेणे, दंडवत घालणे आदि कार्यक्रम सुरु होते. काही भाविक नवसपूर्तीसाठी गूळ- पेढे तसेच देवाला पूरणपोळीचा नैवद्य देत होते. गाभाऱ्यात गर्दी होऊ नये म्हणून पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.यात्रेसाठी खान्देश भागासह नाशिक, संगमनेर, नगर, श्रीरामपूर, निफाड, नांदगाव, सटाणा, देवळा, सांगवी, तळेगाव आदि भागातून धनगर समाजाचे भाविक पिकअप, ट्रॅक्टर, टेम्पो, जीप, रिक्षा आदि वाहनांतून यात्रास्थळी दाखल झाले होते. राज्य परिवहन महामंडळाने भाविकांची जाण्या येण्याची कुठलीही व्यवस्था केली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. दुपारी भक्तमंडळींनी म्हाळोबा मंदिराच्या पूर्वेला ‘पाऊलटेकडी’ येथे तळेगाव येथील मानाच्या काठीच्या भेटीनंतर जिल्हाभरातून आलेल्या मानाच्या काठ्यांची भेट घडविण्यात आली. ही काठ्यांची गुरशिष्य भेट म्हणून गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा सुरु आहे. यावेळी दोडी बुद्रुक येथील भक्तगण ढोल, सनई, ललकारी, धनगरी गजनृत्य सादर करीत पाऊल टेकडीकडे गेले. यावेळी गगणचुंबी काठीमहाल घेऊन देवभेट घडवली. (वार्ताहर)