शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
2
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
3
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
4
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
5
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
6
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
7
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
8
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
9
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
10
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
11
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
12
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
13
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
14
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
15
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
16
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
17
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
18
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
19
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
20
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 

ज्येष्ठ रंगकर्मी मुरलीधर खैरनार यांचे निधन

By admin | Updated: December 6, 2015 23:55 IST

सांस्कृतिक क्षेत्राला धक्का : अभ्यासू, बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले

नाशिक : ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक, पत्रकार तथा नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘शोध’ या कादंबरीचे अभ्यासू लेखक मुरलीधर काळू खैरनार (५८) यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. अखेर रविवारी दुपारी १२.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी अ‍ॅड. मृणालिनी खैरनार, कन्या अ‍ॅड. रुक्मिणी खैरनार असा परिवार आहे. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर नाशिक अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. खैरनार यांच्यावर वीस दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच राजीवनगर परिसरातील त्यांच्या निवासस्थानी सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. उत्तम नाट्य दिग्दर्शक, अभिनेते, माहितीपट निर्माते, लेखक, कवी, व्याख्याते असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. २९ जुलै १९५७ रोजी जन्मलेल्या खैरनार यांनी तीस वर्षांहून अधिक काळ नाट्य दिग्दर्शन केले. आवर्त, बिरबलाची गोष्ट, आणखी एक नारायण निकम, आरोपी अनंत राघो बनाम, जास्वंदीचे ओले हात, अजब न्याय वर्तुळाचा, राजाची गोष्ट, घालीन लोटांगण, शुभमंगल, चूकभूल द्यावी घ्यावी आदि अनेक नाटकांच्या दिग्दर्शनासह त्यांनी अभिनयही केला. त्यांच्या ‘गाढवाचं लग्न’ या व्यावसायिक नाटकाचे आजवर तीनशेहून अधिक प्रयोग झाले. कुसुमाग्रजांच्या ‘वैष्णव’ या कादंबरीवर आधारित मालिकेचे दिग्दर्शन त्यांनी केले. काही काळ नाशिक व मुंबईत पत्रकारिता करणाऱ्या खैरनार यांनी शेतकरी संघटनेचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काही वर्षे काम पाहिले. ‘शोध’व्यतिरिक्त त्यांचे ‘मुळीच अवघड नाही’ हे स्मरणशक्ती विकासावरचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. अखिल भारतीय नाट्य परिषद, दीपक मंडळ, सावाना, कुसुमाग्रज प्रतिष्ठान अशा अनेक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे ते माजी प्रमुख कार्यवाह होत.दरम्यान, खैरनार यांना नाशिककरांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बुधवारी (दि. ९) सायंकाळी ६.३० वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृहात शोकसभा होणार आहे. (प्रतिनिधी)