शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

पहिल्याच दिवशी झारखंडला चार सुवर्ण नाशिकच्या रूपालीला तीन रौप्य

By admin | Updated: May 21, 2014 23:39 IST

शालेय राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा : महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी

शालेय राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा : महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी नाशिक : येथे आजपासून प्रारंभ झालेल्या १९ वर्षांआतील शालेय राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी वैयक्तिक गटामध्ये झारखंडने तीन सुवर्णपदकांसह सांघिक गटातही सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्राकडून खेळताना नाशिकच्या रूपाली यमगर हिने दोन रौप्यपदकांसह एक कांस्यपदक पटकावले, तर सांघिकमध्येही संघाला रौप्यपदक प्राप्त करून देण्यात तिचा मोलाचा वाटा राहिला. छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या मैदानावर शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय व नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५९ व्या राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेला प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा ध्वजारोहण व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी नाशिक जिमखान्याचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, ॲड. गोरखनाथ बलकवडे, आनंद खरे, राष्ट्रीय तलवारबाज खेळाडू अजिंक्य दुधारे, क्रीडा उपसंचालक जगन्नाथ अधाणे, जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर स्पर्धेसाठी हरियाणा, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, राज्यस्थान, ओरिसा, आंध्र प्रदेश, पंजाब, छत्तीसगड, चंदीगढ, दिल्ली, महाराष्ट्र, विद्या भारती, गुजरात, झारखंड यांसह १७ राज्यांचे सुमारे २९० तिरंदाज सहभागी झाले आहेत. तीनदिवसीय सदर स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मुलींच्या गटाचे सामने झाले. यात ५० मीटर, ३० मीटर आणि सर्वसाधारण गटात झारखंडने तीन सुवर्णपदक पटकावत पदतालिकेत आघाडी घेतली आहे. दोन रौप्यपदकांसह महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी आहे. सांघिक गटातही झारखंडनेच बाजी मारली असून, महाराष्ट्राच्या मुली दुसर्‍या स्थानी आहेत. निकाल : मुली :५० मीटर : सोबांरी बारी (झारखंड - सुवर्ण), सोनी कुमारी (झारखंड - रौप्य ), रूपाली यमगर (महाराष्ट्र - कांस्य).३० मीटर : सोनी कुमारी (झारखंड - सुवर्ण), रूपाली यमगर (महाराष्ट्र - रौप्य ), अनिता (दिल्ली - कांस्य).सर्वसाधारण : सोनी कुमारी (झारखंड - सुवर्ण), रूपाली यमगर (महाराष्ट्र - रौप्य), सोबांरी बारी (झारखंड - कांस्य).सांघिक मुली : झारखंड (सुवर्ण) : कलावती कुमारी, जयललिता कुमार, सोनी कुमारी, सोबांरी बारी.महाराष्ट्र (रौप्य) : स्वाती नगरकर, रूपाली यमगर, मोहिनी गाडेकर, केतकी शिंदे.दिल्ली (कांस्य) : सत्कीर्ती, चिनू, अनिता, आरतीकुमारी.-------- जोड, फोटो ओळी -----------