शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वातावरण बदलामुळे द्राक्षबागांवर किटकांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:23 IST

परतीच्या पावसाने ओढ दिली असून, वातावरणात कमालीची आर्द्रता वाढू लागल्याने त्याचा थेट दुष्परिणाम द्राक्षबागांवर होत आहे. द्राक्षांवर किटकांचा प्रादुर्भाव वाढू लागला असून, तो नियंत्रणात आणताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

नाशिक : परतीच्या पावसाने ओढ दिली असून, वातावरणात कमालीची आर्द्रता वाढू लागल्याने त्याचा थेट दुष्परिणाम द्राक्षबागांवर होत आहे. द्राक्षांवर किटकांचा प्रादुर्भाव वाढू लागला असून, तो नियंत्रणात आणताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण यावर्षी अल्प राहिल्याने द्राक्षांना पुरेसे पाणी मिळणेही अवघड झाले आहे. एकूणच द्राक्ष बागायतदार वातावरण बदलाच्या या दुष्परिणामामुळे संकटात सापडल्याचे चित्र आहे.नाशिक जिल्हा द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे उत्पादन घेतले जात असल्याने वायनरींची संख्याही वाढली आहे. येथील वाइन, द्राक्षांना आंतरराष्टÑीय बाजारपेठेत मागणी आहे. यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्षबागांवर ‘संक्रांत’ आली आहे. वातावरण बदलामुळे आर्द्रता वाढत असल्याने द्राक्षांवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. वाढत्या आर्द्रतेने द्राक्षांवर विविध प्रकारच्या किटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सकाळी जास्त प्रमाणात दव पडत असल्याने द्राक्षांचे घड मोठ्या प्रमाणात कुजू लागल्याचे द्राक्ष उत्पादक मदन ढेरिंगे यांनी सांगितले. द्राक्षाचा मणी तयार होत असताना वातावरण बदल, मुबलक पाण्याच्या अभावामुळे गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने शेतकरी धास्तावला आहे. हिरवे तुडतुडे, अळीचे प्रमाण अधिक झाल्याने किटकनाशक फवारणी अधिक प्रमाणात शेतकºयांना करावी लागत आहे. जमिनीमध्ये पाण्याची पातळी घटल्याने द्राक्षांच्या घडाचा आकारही कमी राहत आहे. द्राक्षबागांमधील झाडांवर फळधारणाही कमी-जास्त प्रमाणात दिसून येत असल्याने उत्पादनावर त्याचा परिणाम जाणवणार आहे.पावसाची हुलकावणीसप्टेंबर छाटणी शेतकºयांनी पावसाच्या भरवशावर केली; मात्र त्यानंतर पाऊस झाला नाही, परिणामी द्राक्ष उत्पादनावर परिणाम दिसून येत आहे. जानेवारीमध्ये या छाटणीचा माल बाजारात येईल त्यावेळी आवक जास्त होण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी द्राक्षबागांमध्ये उत्पादनाच्या तफावतीमुळे त्याचा परिणाम आवकेवर निश्चित स्वरूपात होईल.

टॅग्स :TemperatureतापमानagricultureशेतीNashikनाशिक