सायखेडा : दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे पाणी टंचाई निर्माण झाल्याने शेतातील उभे पिके करपून गेल्याने शेतमालाची आवक घटली आहे.मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने आठवडे बाजारात शेतीमाल अल्प प्रमाणात विक्र ीसाठी उपलब्ध होत असल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहे, वाढते बाजारभाव शेतकऱ्यांना दिलासा देणारे असले तरी सर्व सामान्य माणसाच्या खिशाला न परवडणारे आहे. त्यामुळे आर्थिक गणित कोलमडले आहे.वर्षभर शेतीमाल कवडीमोल भावात विक्र ी करावा लागला, अनेक शेतकऱ्यांना पिकासाठी लागणारे भांडवल देखील वसूल झाले नाही. अनेक शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विक्र ीसाठी नेला नाही. डिसेंबर महिन्यापासून विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असतांना शेतीसाठी पाणी कुठून येणार? अशा परिस्थितीत शेतातील उभी पिके सुकू लागली आहेत. आठवडे बाजारात शेतीमालाची आवक घटली आहे. भाजीपाल्याचा तुडवडा निर्माण झाला आहे. बाजारात विक्र ीसाठी येणाºया अवक घटल्याचा परिणाम बाजार भावावर झाला आहे. वर्षभर न मिळालेला भाव मिळत आहे.दुष्काळाची झळ सामान्य माणसाच्या खिशाला बसत आहे. उन्हाळ्यात हाताला काम मिळत नाही, मजुरी नाही, शेतकºयांकडे पैसे नाही अशा परिस्थितीत कुटुंब चालवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.आजचे बाजारभावमेथी २० रुपये जुडी, कोबी ३० रुपये गड्डा, फ्लॉवर ७० रु पये किलो, मिरची ८० रुपये किलो, दोडका ८० रुपये किलो, कारले ६० रुपये किलो, शेपू २० रुपये जुडी, टमाटे ४० रुपये किलो, गिलके ६० रुपये किलो.चौकटदुष्काळ परिस्थितीमुळे विहिरींनी लवकर तळ गाठला. उभे पिके करपून गेले. त्यामुळे शेतीमालाचा आज तुटवडा निर्माण झाला आहे. वर्षभर कवडीमोल भावाने विक्र ी केलेल्या शेतीमालाला आज चार पैसे मिळत असले तरी, केवळ ५ टक्के लोकांना त्याचा फायदा होईल, ९५ टक्के शेतकºयांकडे मालाच विक्र ीसाठी उपलब्ध नाही.ज्ञानेश्वर पोटे, भुसे.आठवडे बाजारात गगनाला भिडलेले. भाजीपाल्याचे दर आज खिशाला महाग होत आहे. कोणताही भाजीपाला किमान ५० रुपये किलो दराच्या पुढे खरेदी करावा लागत आहे, उन्हाळा असल्याने हाताला काम मिळत नाही, त्यामुळे कुटुंब खर्च करणे अवघड झाले आहे.रवींद्र शिंदे, भेंडाळी.शेतकºयांकडे शेतीमाल कमी झाला की बाजारभाव वाढतात. शेती मालाचे भाव स्थिर राहिले पाहिजे. शेतकºयांना कायम भाव मिळाला तर त्यांची आर्थिक परिस्थिती बदलेल. आज केवळ मालाचा तुडवडा झाल्याने भावात तेजी आली, नाही तर वर्षभर कवडीमोल भावात विक्र ी करावी लागली.कैलास डेर्ले, शिंगवे.
शेतीमालाची आवक घटल्याने भाजीपाला कडाडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 17:52 IST
सायखेडा : दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे पाणी टंचाई निर्माण झाल्याने शेतातील उभे पिके करपून गेल्याने शेतमालाची आवक घटली आहे. मागणीपेक्षा ...
शेतीमालाची आवक घटल्याने भाजीपाला कडाडला
ठळक मुद्देआर्थिक गणित कोलमडले आहे.