शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

भाजीपाला विक्रेत्यांचा स्थलांतरास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 00:26 IST

मनमाड:- पालिका प्रशासनातर्फे शहरातील भाजी मार्केट गावाबाहेर स्टेडियमवर हलविण्यात आल्याने संतप्त झालेल्या भाजीपाला विक्रेत्यांनी आज पालिकेवर मोर्चा काढून धरणे ...

ठळक मुद्देमनमाड पालिकेत धरणे आंदोलन

मनमाड:- पालिका प्रशासनातर्फे शहरातील भाजी मार्केट गावाबाहेर स्टेडियमवर हलविण्यात आल्याने संतप्त झालेल्या भाजीपाला विक्रेत्यांनी आज पालिकेवर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले .

यावेळी आंदोलकांनी पालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भाजी मार्केटचे अर्धवट असलेले काम पूर्ण करण्यात यावे व भाजी मार्केट पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली. शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या भगतसिंग मैदानाजवळ जुने भाजी मार्केट तोडून त्या ठिकाणी १९९८ साली नवीन भाजी मार्केटचे काम सुरू करण्यात आले.

मात्र तब्बल २२ वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर देखील मार्केटचे काम अर्धवट आहे. त्यामुळे भाजीपाला विक्रते मिळेल त्या जागी दुकाने लावून आपला उदरनिर्वाह करतात. मुख्याधिकारी विजय कुमार मुंडे यांच्याकडे वाहतुकीची कोंडी होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर, भाजीपाला मार्केट आययूडीपी भागात असलेले महर्षी वाल्मिकी स्टेडियममध्ये हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे भाजी विक्रेत्यांवर अचानक बेरोजगारीचे संकट आल्याने कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला.

अखेर संतप्त झालेल्या भाजी विक्रेत्यांनी नगरसेवक गंगाभाऊ त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर धडक मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. आम्हाला व्यवसाय करू द्या नाही तर आत्महत्त्या करण्याची परवानगी द्या, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. माजी नगराध्यक्ष रहेमान शहा यांनीदेखील भाजी विक्रेत्यांची बाजू मांडली.प्रशासनातर्फे आश्वासनमुख्याधिकारी मुंडे यांनी भाजी विक्रेते आणि हातगाडी लावणारे तरुण यांच्या व्यथा जाणून घेतल्या. भाजी मार्केटचे अर्धवट असलेल्या कामाला सुरुवात केली जाईल तोपर्यंत पालिका प्रशासनातर्फे मार्केटच्या आतील साफसफाई करून आणि तेथे सर्व व्यवस्था करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. आंदोलनात मोठ्या संख्येने भाजी विक्रेते सहभागी झाले होते.

टॅग्स :Marketबाजारroad safetyरस्ते सुरक्षा