पंचवटी : लॉकडाउनचा फायदा सर्वच जीवनावश्यक वस्तूविक्रे ते घेत आहेत. भाजीविक्रेतादेखील उघडपणे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा दराने भाजीपाला विक्र ी करून आर्थिक लूट करत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.लॉकडाउन असल्याने भाजीपाला महाग झाला असल्याचे सांगत तर कधी बाजार समितीत भाजीपाला येत नसल्याचे खोटे सांगून रस्त्यावर तसेच हातगाडीवर भाजीपाला विक्र ी करणारे भाजीपाला विक्रेते गेल्या महिना-दीड महिन्यापासून मनाला वाटेल त्या भावाने भाजीपाला विक्र ी करत आहेत. नागरी वसाहतीप्रमाणे भाजीपाल्याचे दर ठरत आहेत. भाजीविक्रेते चारपट दराने भाज्यांची विक्र ी करत असल्याने रोजच्या जेवणात लागणारा भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.हातगाडी तसेच रस्त्यावर फळभाज्या आणि भाजीपाला विक्र ी करणारे विक्रेते कोबी २० रुपये प्रतिकंद, तर वांगी ४० रु पये, भेंडी ६० रु पये, फ्लॉवर ८० रुपये गवार १०० रुपये, हिरवी मिरची ८० रुपये, बटाटा ४० रुपये, कांदे ३० रुपये, प्रतिकिलो आणि मेथी ३०, कांदापात ३० रुपये, पालक १५ रुपये प्रतिजुडी दराने विक्र ी करून उघडपणे ग्राहकांची आर्थिक लूट करत असल्याचे दिसून येत आहे.
भाजीविक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 23:01 IST