भाजीपाल्याच्या दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 03:32 PM2019-12-20T15:32:10+5:302019-12-20T15:32:19+5:30

सायखेडा : काही दिवसांपूर्वी वधारलेल्या भाजीपाला आणि फळभाज्यांचे भावात मोठी घसरण झाली आहे. मेथी, शेपू, कोथंबीर, टमाटा, पालक, चिल, काकडी, दोडका , गिलके या भाज्यांना बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.

 Vegetable prices fall | भाजीपाल्याच्या दरात घसरण

भाजीपाल्याच्या दरात घसरण

googlenewsNext

विक्रमी आवक : गोदाकाठ परिसरात शेतकऱ्यांचा खर्च होईना वसूल


सायखेडा : काही दिवसांपूर्वी वधारलेल्या भाजीपाला आणि फळभाज्यांचे भावात मोठी घसरण झाली आहे. मेथी, शेपू, कोथंबीर, टमाटा, पालक, चिल, काकडी, दोडका , गिलके या भाज्यांना बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. भाज्यांना पिकविण्यासाठी केलेला खर्च निघत नसल्याने मोठ्या प्रमाणावर भांडवल वाया जात आहे.
पंधरा दिवसांपूर्वी कोथिंबीर २०० रूपये जुडी, मेथी ५० रुपये जुडी तर शेपू ४० रूपये जुडीने बाजारात किरकोळ आणि घाऊक विकली जात होती. परंतु गेल्या काही दिवसात भाजीपाल्याचे गगनाला भिडलेले भाव अचानक खाली घसरले आहेत. बाजारात भाज्यांचे ढीग पडलेले आहे तर अनेक शेतकऱ्यांनी विक्र ीसाठी आणावयाचा खर्च सुद्धा वसूल होत नसल्याने भाज्या शेतात पडून आहे. अनेक शेतकºयांनी एक दोन एकर किंवा त्यापेक्षा जास्त जमिनीत भाज्यांची लागवड केली आहे. किमान चाळीस ते पन्नास हजार इतका खर्च करून आज एक रु पया देखील उत्पादन निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.
------------------------------
भाज्यांचे विक्र मी उत्पादन
खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमुंग, मका ही पिके साधारण आक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात निघतात. पिके निघाल्यानंतर त्या जमिनीत शेतकरी कांद्याची लागवड करत असतो. यंदा प्रथमच कांद्याचे रोपे पावसाने खराब झाल्याने आणि नवीन रोपे लागवडीसाठी किमान दोन महिने कालावधी असल्याने त्या जमिनीत काय करावे म्हणून दीड ते दोन महिन्यांचे सोपे आणि लवकर येणारे पीक म्हणून भाज्यांची लागवड केली असा निर्णय बहुतांशी शेतकºयांनी घेतल्याने भाज्यांची विक्र मी आवक झाली. त्यामुळे दर कोसळले असल्याचे बोलले जात आहे
-----------------
भाज्यांची आवक वाढत असल्याने मागणीपेक्षा पुरवठा जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव कमी झाले आहे. यापुढे काही महिने असेच भाव कमी राहण्याची शक्यता आहे. पालेभाज्यांचे भाव कमी झाल्यामुळे फळ भाज्यांचे भाव सुद्धा कमी झाले आहे.
-नितीन कांडेकर, भाजीपाला व्यापारी
----------------------------
कांद्याची रोपे खराब झाली. लागवडीचे क्षेत्र जास्त आणि रोपे कमी अशी परिस्थिती निर्माण झाली. नंतर बियाणे टाकले मात्र त्यास लागवडीला येण्यासाठी अवधी असल्याने भाज्या केल्या. हजारो रु पये खर्च केला आज मात्र भाज्यांना कवडीमोल भाव मिळत असल्याने खर्च देखील वसूल होत नाही.
-विनायक आढाव, शेतकरी
-------------------------------
आजचे बाजारभाव
मेथी : १ ते २ रूपये जुडी
पालक : १ ते २ रूपये जुडी
चिल : २ ते ३ रूपये जुडी
कोथिंबीर : २ ते ५ रु जुडी
शेपू : ५ ते १० रूपये जुडी
टमाटे : २० ते ५० रूपये (२० किलो कॅरेट)
काकडी : ५० ते ७० रूपये (२० किलो कॅरेट)
दोडका : ३० ते १०० रूपये कॅरेट
गिलके : २० ते ७० रूपये कॅरेट

Web Title:  Vegetable prices fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक