पंचवटी : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गंगाघाटावरील शेकडो भाजीविक्रेते मनपाने उभारलेल्या गणेशवाडीतील नवीन भाजीमंडईत स्थलांतर करणार आहेत. सोमवारी भाजीबाजाराचे स्थलांतर करण्याचा निर्णय गंगामाई व्यापारी संघटनेने घेतला आहे. रविवारचा बाजार आटोपल्यानंतर सोमवारी संपूर्ण भाजीबाजारात स्वच्छता मोहीम राबवून भाजीबाजाराचे स्थलांतर केले जाईल.सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने गंगाघाट हा महत्त्वाचा परिसर असून, भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी भाजीबाजाराचे स्थलांतर झाल्यानंतर नवीन भाजी मंडईत बुधवारच्या आठवडे बाजार भरणार आहे.
भाजीमंडईत स्थलांतर
By admin | Updated: June 23, 2015 02:01 IST