पंचवटी : पावसामुळे पालेभाज्यांची आवक वाढल्याने सर्वच पालेभाज्यांचे बाजारभाव घसरले आहेत, तर दुसरीकडे मात्र फळभाज्या तेजीत आहेत. बाजार समितीत कारली, वांगी, भोपळा, सिमला मिरची यांसारख्या फळभाज्यांची दैनंदिन आवक कमी होत असून, मागणी वाढल्याने बाजारभाव तेजीत आहेत. बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या फळभाज्यांपैकी कारली ३० रुपये, भोपळा प्रतिनग २० रुपये, ढोबळी मिरची ४० रुपये, तर वांगी ३० रुपये किलो दराने विक्री होत आहे. पावसामुळे पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. फळभाज्यांना ग्राहकांकडून मोठी मागणी असल्याने सध्या सर्वच फळभाज्यांचे बाजारभाव तेजीत आले आहेत. सध्या पावसाने उघडीप दिल्याने बाजार समितीत सर्वच प्रकारच्या पालेभाज्या विक्र ीसाठी दाखल होत असल्याचे बाजार समितीतील व्यापारी उमापती ओझा यांनी सांगितले. (वार्ताहर)
पालेभाज्या स्वस्त, फळभाज्या तेजीत
By admin | Updated: August 12, 2016 23:48 IST