भऊर : वीर एकलव्य जयंती निमित्त भऊर. ता.देवला येथे सकाळी प्रतिमा पुजन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी गावातून सवाद्य मिरवणुक काढण्यात आली.वीर एकलव्य जयंती निमित्त जगदीश पवार, सुनिल पवार, सरपंच दादा मोरे, सुभाष पवार, माजी सरपंच कारभारी पवार, पोलिस पाटील भारत पवार, उपसरपंच बळीराम पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व वीर एकलव्य महाराज यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. महिलांनी घरासमोर सडा रांगोळी काढली होती. सायंकाळी सरपंच दादा मोरे यांच्या हस्ते वीर एकलव्य महाराजांची प्रतिमा ठेवलेल्या रथाचे पुजन करु न मिरवणुकीस सुरु वात करण्यात आली. सजवलेल्या रथातुन ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करीत गावातील प्रमुख मार्गावरुन ही मिरवणुक काढण्यात आली.यावेळी ठिकठिकाणी सुवासिनींनी रथाचे व प्रतिमेचे औक्षण करु न पुजन केले.या वेळी सरपंच बाळु माळी, तानाजी माळी, अण्णा बोरसे, शिवाजी शिंदे, राजाराम मोर, बाजीराव मोरे, शिवाजी माळी, मोहन माळी, धनंजय शिंदे, दिपक पवार, दिनेश पवार, शरद पवार, केदा पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थीत होते.
भऊर येथे वीर एकलव्य जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 19:03 IST
भऊर : वीर एकलव्य जयंती निमित्त भऊर. ता.देवला येथे सकाळी प्रतिमा पुजन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी गावातून सवाद्य मिरवणुक काढण्यात आली.
भऊर येथे वीर एकलव्य जयंती साजरी
ठळक मुद्देठिकठिकाणी सुवासिनींनी रथाचे व प्रतिमेचे औक्षण करु न पुजन केले.