शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भोजापूर खोरे परिसरात वरुणराजा रुसलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 15:20 IST

नांदूरशिंगोटे : पावसाचे माहेरघर असलेल्या सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरात अद्यापही वरुणराजा रुसलेलाच आहे. पावसाळा सुरू होवून दोन महिन्याचा ...

ठळक मुद्देनांदूरशिंगोटे : पावसाचे माहेरघर असलेल्या सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरात अद्यापही वरुणराजा रुसलेलाच आहे. पावसाळा सुरू होवून दोन महिन्याचा कालावधी उलाटला तरीही बंधारे कोरडेठाक आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

नांदूरशिंगोटे : पावसाचे माहेरघर असलेल्या सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरात अद्यापही वरुणराजा रुसलेलाच आहे. पावसाळा सुरू होवून दोन महिन्याचा कालावधी उलाटला तरीही बंधारे कोरडेठाक आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे.भोजापूर खोरे परिसरात जुन महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी केली आहे. प्रामुख्याने चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी हा भाग तालुक्यातील बागायती परिसर म्हणून ओळखला जातो. दरवर्षी या भागात पावसाचे प्रमाण चांगल्या प्रमाणात असते. यावर्षी शेतकऱ्यांनी बाजरी, मका, सोयाबीन, भुईमूग आदी पिकांची पेरणी केली आहे. तसेच या भागातच भोजापूर धरण असल्याने नेहमीच हिरवीगार शेती पाहयाला मिळते. यावर्षी धरणात पाहिजे त्या प्रमाणात पाण्याचा साठा झालेला नाही. आजमितीस धरणात 40 टक्के पाणी साठा आहेत. भोजापूर धरणाच्या खाली असलेले तसेच म्हाळुंगी नदीवर असलेले केटीवेअर, बंधारे कोरडेठाक आहेत. पिकांची लागवड केल्यानंतर दीड ते दोन महिन्यापासून या भागात पावसाने पाठ फिरवल्याने पिके धोक्यात आली आहे. समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. भोजापूर खोरे परिसरातील चास येथील ठरावीक भागातच पावसाने हजेरी लावली असून उर्वरित भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे बळीराजा दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरण