शहरं
Join us  
Trending Stories
1
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
2
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
3
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
4
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
5
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
6
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
7
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
8
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
9
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
10
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
11
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
12
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
13
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
14
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
15
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
16
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
17
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
18
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
19
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी
20
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट

वरखेडा-कादवा रस्त्याची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 18:39 IST

दिंडोरी तालुक्यातील वरखेडा ते कादवा सहकारी साखर कारखाना या रस्त्याची चाळण झाली असून, हा रस्ता त्वरित दुरु स्त करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देवाहनधारक त्रस्त : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; तातडीने दुरुस्तीची मागणी

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वरखेडा ते कादवा सहकारी साखर कारखाना या रस्त्याची चाळण झाली असून, हा रस्ता त्वरित दुरु स्त करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.कादवा ते मातेरेवाडी या दळवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडलेले आहे. सर्व रस्ते खड्ड्यांमध्ये हरवून गेले आहेत. रस्त्यावर सतत वाहतुकीची वर्दळ असते. परंतु या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहन चालकांना वाहने चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते. एवढे असूनही शासनाला या रस्त्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने हे रस्ते महत्त्वपूर्ण आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाची वाहतूक याच रस्त्यावरून होत असते. या रस्त्याची दयनीय स्थितीमुळे शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत नेण्यास विलंब होत असतो. परिणामी त्याचा फटका बसत आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणाºया प्रवाशांची अक्षरश: हाडे खिळखिळी होत आहेत. या रस्त्याचे कामे होऊन जास्त कालावधी लोटलेला नाही. एवढा कालावधी उलटूनही किरकोळ डागडुजीवगळता काहीही कामे करण्यात आलेली नाहीत. रस्त्याच्या या दुरवस्थेचा सर्वाधिक फटका जनतेला पावसाळ्यात बसत असतो. रस्त्यावरील खड्ड्यामध्ये पावसाच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते. त्यामुळे वाहने घसरून अपघात होण्याचा धोका वाढतो. परंतु याकडे लक्ष देण्यासाठी शासनाला वेळ आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. सर्वांगीण विकास साधण्यासाठी रस्त्याचा विकास महत्त्वाचा आहे. रस्त्यांचा विकास झाला म्हणजे दळणवळण वाढेल परिणामी परिसराचा विकास होईल, हे दस्तूरखुद्द शासनाचेच धोरण आहे. परंतु सरकार ग्रामीण भागात दळणवळणासाठी निधी उपलब्ध करून देत नाही. त्याचा परिणाम जाणवत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकroad transportरस्ते वाहतूक