शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

आषाढीनिमित्त उद्या विविध धार्मिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:44 IST

परिसरातील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिकरोड : परिसरातील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  विहितगाव येथील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल मंदिरात सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त पहाटे मूर्तीला महाअभिषेक करून काकड भजन होणार आहे. त्यानंतर मनपा उद्यान विभाग व मंदिराचे विश्वस्त यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी काढून गावात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता हभप हर्षद गोळेसर, सुदाम धोंगडे व दिनेश मोजाड हे संगीत भजन सादर करणार आहेत. दुपारी १२ वाजता माउली सांप्रदायिक महिला मंडळाचे भजन, बाहेरगावच्या पहारेकºयांचे भजन होईल. सायंकाळी ५ वाजता हरिपाठ, आरती व रात्री आळंदी येथील अनिल महाराज तुपे यांचे हरिकीर्तन होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवाजी हांडोरे, डॉ. बाळासाहेब कोठुळे, प्रकाश हगवणे, संजय हांडोरे, बाळू कोठुळे, अमर जमधडे व ग्रामस्थांनी केले आहे  नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे बंगालीबाबा दर्ग्याजवळील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात सोमवारी सकाळी ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते महापूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर दिवसभर विविध भजनी मंडळे भजन सादर करणार आहेत. तसेच महापूजेनंतर महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आलठक्कर सेवाभावी मंडळाचे अध्यक्ष कन्हैयालाल आलठक्कर यांनी केले आहे. तसेच देवळालीगाव श्री विठ्ठल मंदिर, मुक्तिधाम लक्ष्मीनारायण मंदिर, जेलरोड ज्ञानेश्वरनगर श्री विठ्ठल मंदिर आदीं मंदिरांत आषाढी एकादशीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी