शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मणगाव परिसरात पक्ष्यांसाठी विविध फळझाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 17:49 IST

एकीकडे सर्वत्र चिमणी व अन्य प्रकारच्या पक्षांची संख्या कमी होत असताना येथील निसर्गप्रेमी पदवीधर शेतकरी प्रकाश कौतिक अहिरे यांनी आपल्या शेतातील रहात्या बंगल्याजवळ अनेक प्रकारची फुले, फळ झाडे लावून पक्ष्यांसाठी पाणी व खाण्यासाठी धान्याची व्यवस्था केली आहे. त्यांचे शेतात आज शेकडोच्या संख्येने चिमणी, कावळे, साळुंकी व अन्य पक्षी दररोज येतात .

ठळक मुद्देचिमण्यांसह साळूक्यांचा किलबिलाट : अंगणात पाण्याबरोबरच वेगवेगळ्या धान्याची व्यवस्था

ब्राह्मणगाव : एकीकडे सर्वत्र चिमणी व अन्य प्रकारच्या पक्षांची संख्या कमी होत असताना येथील निसर्गप्रेमी पदवीधर शेतकरी प्रकाश कौतिक अहिरे यांनी आपल्या शेतातील रहात्या बंगल्याजवळ अनेक प्रकारची फुले, फळ झाडे लावून पक्ष्यांसाठी पाणी व खाण्यासाठी धान्याची व्यवस्था केली आहे. त्यांचे शेतात आज शेकडोच्या संख्येने चिमणी, कावळे, साळुंकी व अन्य पक्षी दररोज येतात .आजूबाजूला झाडांची संख्या खूप असल्याने वातावरणात गारवा राहत असल्याने सर्व पक्षी दाणे खाऊन, पाणी पिऊन आनंदाने दिवसभर किलिबलाट करत खेळत राहतात..श्री. अहिरे यांना विविध प्रकारची झाडे लावण्याची आवड आहे. तसेच गिर्यारोहणची ही आवड आहे. निसर्गाशी जवळीक असल्याने त्यांना पशूपक्षांची आवड आहे. त्यांनी पक्ष्यांसाठी पाण्याची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. तसेच ते पक्षांसाठी दररोज दाणे टाकतात. पक्षांसोबत त्यांचेकडे मांजर, पाळीव कुत्रा असून पक्षांचे रोजचे येणे खेळणे पाहून मांजरे व श्वानही पक्षांसोबत आनंदाने दिवसभर सावलीत खेळतात. सर्वत्र कडक ऊन, तापमान ४० च्या पार गेले असताना येथे मात्र झाडांची दाट गर्दी असल्याने सुखद गारव्यामुळे पक्षांची किलबिल मनाला सुखद आनंद देऊन जाते.

टॅग्स :Nashikनाशिकwildlifeवन्यजीव