व्ही. एन. नाईक कॉलेज व्ही. एन. नाईक इंजिनिअरिंग शिक्षण आणि संशोधन नाशिक येथील संस्थेने संविधान दिनानिमित्त डॉ. विजयकुमार वाबळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. के. द्विवेदी होते. सूत्रसंचालन प्रा. बी. जी. पवार यांनी केले. प्रा. आर. आर. चकुली यांनी आभार मानले.सीडीओ मेरी हायस्कूल४नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सीडीओ मेरी हायस्कूल येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आ. का. वाणी होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक प्रतिनिधी दिलीप अहिरे, पर्यवेक्षक सौ. कृष्णा राऊत उपस्थित होते. याप्रसंगी माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद, घटना समितीचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे व सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संविधान तथा भारताच्या राज्यघटनेविषयी दिलीप अहिरे यांनी माहिती दिली. सौ. राऊत यांनी भारताचे संविधानाचे प्रास्ताविक सर्व उपस्थितांकडून म्हणून घेतले. यावेळी शरद शेळके, सौ. छाया गुंजाळ, सौ. भारती भोये, मोहिनी तुरेकर, साहेबराव राठोड, हिरामण अहिरे, पंढरीनाथ बिरारी, बापू चव्हाण उपस्थित होते. सौ. दीपमाला चौरे यांनी सूत्रसंचालन व संयोजन केले, तर संजय अहेर यांनी स्वागत करून आभार मानले.मराठा हायस्कूल४मराठा हायस्कूल येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एस. कारे होत्या. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गिते सादर केली. दहावीच्या विद्यार्थ्यांनी संविधानदिन सादर केला. शालेय पंतप्रधान गौरव मुरकुटे याने संविधान प्रस्तावनाचे वाचन केले.
संविधान गौरवदिनी विविध उपक्रम
By admin | Updated: November 28, 2014 23:01 IST