गारांचा पाऊस : वृक्ष उन्मळले; वाहनांचे नुकसाननाशिक : दुपारच्या सुमारास सोसाट्याच्या वादळवार्यासह रोहिणी नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली. सुरुवातीला वादळीवार्यासह पावसाने शहराला झोडपल्यानंतर काही वेळेतच गारांचाही पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने नाशिककरांची धांदल उडाली, तर वादळीवार्याने शहरात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी यामुळे वाहनांचेही नुकसान झाले. मंगळवारी सकाळपासूनच वातावरणात उकाडा वाढला होता. दुपारी दोन वाजेच्या सुमारास सोसाट्याचा वादळीवारा सुरू झाला. काही क्षणात अवघे शहर धुळीच्या कणांनी झाकोळून गेले. वादळीवार्यामुळे शहरात अनेक ठिकाणी वृक्षांच्या फांद्या तुटून पडल्या. रस्त्यालगत असलेले जाहिरातींच्या फलकांचेही नुकसान झाले. काही वेळेतच रोहिणीच्या पावसाने गारांसह हजेरी लावली. वादळीवारा आणि पाऊस यामुळे शहरातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठाही खंडित झाला होता. जोरदार वादळी वारा अन् गाराच्या पावसाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील वृक्ष उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे जेहान सर्कल, पंचवटीतही वृक्ष उन्मळून येथेही वाहनांचे नुकसान झाले. वडाळागाव, वाघाडी नाल्यालगतच्या बुरुड डोह परिसरातील झोपडप्यांतील घरांचे पत्रे उडून गेले, तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून विजेच्या तारांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता, तर विजेच्या तारा लोंबकळताना दिसत होत्या.
वादळवार्यासह बरसल्या रोहिणी (सीडीसाठी)
By admin | Updated: May 28, 2014 01:03 IST