शहरं
Join us  
Trending Stories
1
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
2
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
3
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
4
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
5
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
6
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
7
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
8
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
9
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
10
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
11
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
12
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
13
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
14
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
15
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
16
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
17
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
18
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
19
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही

वरदडीला प्राचीन शनिमंदिरात अमावास्येला भाविकांची गर्दी

By admin | Updated: July 28, 2014 00:51 IST

वरदडीला प्राचीन शनिमंदिरात अमावास्येला भाविकांची गर्दी

चांदवड : तालुक्यातील प्राचीन शनिमंदिर वरदडी, उसवाड येथे भाविकांनी शनि अमावास्येला गर्दी केली होती, तर दर्शनासाठी दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या. उसवाडपासून तीन किमी अंतरावर व राहुडपासून दोन किलोमीटर अंतरावर प्राचीन वरदडी शनिमंदिर प्रसिद्ध आहे. येथे शनि महात्म्यमधील आख्यायिकेनुसार विक्रम राजाचा घोडा येथे उतरला होता. आजही येथे घोड्याच्या टापा खडकावर दिसून येतात. येथील शनिमंदिरात शनि अमावास्या व दीप अमावास्येला मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती. तर या मंदिराचा कारभार ट्रस्टच्या ताब्यात आल्याने ट्रस्टने विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सकाळपासून या मंदिरात पाच- पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या, तर खान्देश व उत्तर महाराष्ट्रातील अनेक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. शनि अमावास्येला या मंदिरात कीर्तन व भजनाचा कार्यक्रम व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. परिसरात यात्रेचे स्वरुप आले होते. अनेक दुकाने थाटली होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रस्टने वाहने मंदिरावर वरील डोंगरावरच लावली होती. चांदवड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. दरम्यान, चांदवड शहरातील पुरातन शनिमंदिर व कार्तिकेश्वर मंदिरात शनि अमावास्येनिमित्त असंख्य भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला, तर यामंदिरात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती. पुरोहित अंबादास दीक्षित व प्रदीप उपासनी यांनी भविकांना सेवा दिली. ( वार्ताहर)