शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक पश्चिम प्रभाग सभापतिपदी मनसेच्या वैशाली भोसले बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:20 IST

महापालिकेच्या पश्चिम प्रभाग समितीच्या सभापतिपदी मनसेच्या अ‍ॅड. वैशाली मनोज भोसले यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. दोन आठवड्यापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या भोसले यांना राजकीय पदार्पणातच सभापतिपदाची संधी मिळाली आहे. भाजपाने मागील वर्षीच प्रभाग सभापतिपदासाठी मनसेला पाठिंबा दर्शविल्याने सदर निवड बिनविरोध झाली.

नाशिक : महापालिकेच्या पश्चिम प्रभाग समितीच्या सभापतिपदी मनसेच्या अ‍ॅड. वैशाली मनोज भोसले यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. दोन आठवड्यापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या भोसले यांना राजकीय पदार्पणातच सभापतिपदाची संधी मिळाली आहे. भाजपाने मागील वर्षीच प्रभाग सभापतिपदासाठी मनसेला पाठिंबा दर्शविल्याने सदर निवड बिनविरोध झाली. पश्चिम विभागात प्रभाग क्रमांक ७, १२ आणि १३ हे तीन प्रभाग समाविष्ट करण्यात आले आहेत. पश्चिम विभागात भाजपा-५, शिवसेना-१, कॉँग्रेस-४, राष्टÑवादी-१ आणि मनसे-१ असे पक्षीय बलाबल होते. मनसेच्या नगरसेवक सुरेखा भोसले यांचे निधन झाल्याने त्यांच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होऊन मनसेने पुन्हा आपली जागा राखली. या पोटनिवडणुकीत अ‍ॅड. वैशाली मनोज भोसले निवडून आल्या. दोन आठवड्यांपूर्वीच महापालिकेच्या सभागृहात प्रवेश करणाऱ्या वैशाली भोसले यांना राजकीय पदार्पणातच सभापतिपदाची उमेदवारी देण्यात आली. मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत भाजपाने मनसेला पाठिंबा दर्शविला होता. त्यानुसार, सातपूर प्रभाग समितीवर भाजपाला कब्जा करता आला होता मात्र, पश्चिम प्रभाग समितीत सुरेखा भोसले या आजारपणामुळे उपस्थित राहू न शकल्याने कॉँगे्रेसच्या हेमलता पाटील यांनी भाजपाच्या प्रियंका घाटे यांना पराभूत केले होते. दरम्यान, यावर्षी सातपूर प्रभाग समितीवर मनसेचा सभापती निवडून आल्यानंतर पश्चिम प्रभागसाठी मनसेच्याच उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय भाजपाने घेतला. त्यानुसार, मनसेच्या वैशाली भोसले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. शनिवारी (दि.२१) सकाळी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी वैशाली भोसले यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी, शाहू खैरे, गजानन शेलार, हिमगौरी अहेर, समीर कांबळे सदस्य उपस्थित होते, तर शिवसेनेचे अजय बोरस्ते आणि भाजपाच्या स्वाती भामरे व प्रियंका घाटे गैरहजर राहिल्या. सभापतिपदी निवड झाल्यानंतर वैशाली भोसले यांचा महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार नितीन भोसले उपस्थित होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका