नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत भीमा जाधव, जोगलटेंभीत हरिश्चंद्र जेजुरकर, तर पास्तेत वैशाली आव्हाड यांचा विजय झाला. येथील वॉर्ड ३ मध्ये झालेल्या निवडणुकीत भीमा नामदेव जाधव यांचा विजय झाला. त्यांनी दगू राजाराम मोरे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. जाधव यांना २३१, तर मोरे यांना केवळ ७१ मते पडली. पाच मते अनिर्णित राहिली. सत्ताधारी गटात झालेल्या सरळ लढतीकडे परिसराचे लक्ष लागून होते. जोगलटेंभी येथील निवडणुकीत हरिश्चंद्र भीमा जेजुरकर यांचा विजय झाला. जेजुरकर यांनी विलास बाळकृष्ण गाडेकर यांचा ६७ मतांनी पराभव केला. हरिश्चंद्र जेजुरकर यांना १८८, तर गाडेकर यांना १२० मते पडली. चार मते अनिर्णित राहिली. पास्ते येथील वॉर्ड ३ मधील जागेसाठी वैशाली आव्हाड व रामेश्वर आव्हाड यांच्यात सरळ लढत झाली. यात वैशाली आव्हाड यांनी रामेश्वर आव्हाड यांचा १३३ मतांनी पराभव केला. वैशाली आव्हाड यांना २५०, तर रामेश्वर आव्हाड यांना ११७ मते मिळाली. वैशाली आव्हाड यांच्या विजयाची घोषणा होताच समर्थकांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. यावेळी नेताजी काकड, गोपाळ आव्हाड, बबन आव्हाड, दत्तु आव्हाड, सागर ऊगले, शिवाजी आव्हाड, राजु आव्हाड, भाऊलाल घुगे, माधव पाटील आदी उपस्थित होते.
पास्ते पोटनिवडणुकीत वैशाली आव्हाड विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:11 IST