शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वागदर्डी धरण भरून वाहू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 01:10 IST

मनमाड : गेल्या अनेक वर्षांत पाणीटंंचाईने कळस गाठल्याने हवालदिल झालेल्या मनमाडकरांना नुकत्याच झालेल्या पावसाने दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवडाभरात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरण भरून ओव्हरफ्लो झाले आहे. २०१६ सालानंतर वागदर्डी धरण प्रथमच भरल्याने मनमाडकरांची यावर्षी पाणीटंचाईतून मुक्तता झाली आहे.

ठळक मुद्देसुकाळ : पाणीटंचाईतून मनमाडकरांची मुक्तता

मनमाड : गेल्या अनेक वर्षांत पाणीटंंचाईने कळस गाठल्याने हवालदिल झालेल्या मनमाडकरांना नुकत्याच झालेल्या पावसाने दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवडाभरात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरण भरून ओव्हरफ्लो झाले आहे. २०१६ सालानंतर वागदर्डी धरण प्रथमच भरल्याने मनमाडकरांची यावर्षी पाणीटंचाईतून मुक्तता झाली आहे.गेल्या अनेक वर्षांत वाढत्या पाणीटंचाईमुळे पाणीपुरवठ्याच्या दिवसात सातत्याने वाढ होत गेली. यावर्षी शहराला टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या जलसंकटानंतर यावर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस होत असला तरी मनमाड परिसर मात्र याला अपवाद होता. मधूनच अल्पशा येणाºया पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळत असले तरी भूगर्भातील पाणी पातळीत सुधारणा होत नव्हती. गेल्या आठवडाभरापासून झालेल्या समाधानकारक पावसाने वागदर्डी धरण भरून ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाच्या सांडव्यातून आज पाणी बाहेर निघाले. याबरोबरच शहरासाठी तयार करण्यात आलेला पाटोदा साठवणूक तलाव पूर्ण भरला असून, या उपलब्ध पाण्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईने होरपळलेल्या मनमाडकरांना दिलासा मिळाला आहे. पाणीपुरवठ्याच्या दिवसात कपात होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आॅक्टोबर २०१६ मध्ये हे धरण भरले होते. त्यानंतर सततच्या दुष्काळामुळे वागदर्डी धरण दरवर्षी रिकामे राहत होते.यावर्षी सुरुवातीपासूनच पाऊस सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांच्या खरिपाबरोबरच रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहे.गेल्या अनेक वर्षांपासून रिकामे असलेले मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. पाणीपुरवठ्याच्या दिवसांमध्ये कपात करण्याबाबतची कार्यवाही पालिका प्रशासनाकडून सुरू आहे.-पद्माावती धात्रक,नगराध्यक्ष, मनमाड न.पा.

टॅग्स :DamधरणWaterपाणी