मेशी येथे शिक्षकांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 05:15 PM2021-03-07T17:15:04+5:302021-03-07T17:15:39+5:30

मेशी : देवळा तालुक्यातील मेशी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना कोविडची लस देण्यात आली.

Vaccination of teachers at Meshi | मेशी येथे शिक्षकांना लसीकरण

मेशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख्याध्यापक समाधान सोनवणे यांना लस देतांना आरोग्य कर्मचारी.

Next
ठळक मुद्देडॉ. सुरभी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहीम

मेशी : देवळा तालुक्यातील मेशी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना कोविडची लस देण्यात आली.

केंद्रातील मेशीसह, डोंगरगाव, निंबोळा, महालपाटणे, झगडेपाडा, शरदबाबानगर, रामनगर, निंबोळापाडा, देवपूरपाडे, रणादेवपाडे, गंगावाडी आदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ३४ शिक्षकांनी लस टोचून घेतली.

यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ. सुरभी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहीम संपन्न झाली. यावेळी डॉ. स्वाती मोरे, श्रीमती पगार, आरोग्य सेवक महेश सुर्यवंशी आदींनी परीश्रम घेतले.

 

Web Title: Vaccination of teachers at Meshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.