आडवाडी येथे चारा छावणीतील जनावरांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 05:12 PM2019-05-23T17:12:48+5:302019-05-23T17:13:07+5:30

ठाणगांव : सिन्नर तालुक्यातील आडवाडी येथे चारा छावणी उघडून आठ दिवस झाले आहे. छावणीतील जनावरांना आजार होऊ नये यासाठी रोगप्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले.

Vaccination of fodder camp animals at Aadwadi | आडवाडी येथे चारा छावणीतील जनावरांना लसीकरण

आडवाडी येथे चारा छावणीतील जनावरांना लसीकरण

Next

ठाणगांव : सिन्नर तालुक्यातील आडवाडी येथे चारा छावणी उघडून आठ दिवस झाले आहे. छावणीतील जनावरांना आजार होऊ नये यासाठी रोगप्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले.
ठाणगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी सी. एन. हजारी यांच्या पथकाने छावणीतील जनावराना लसीकरण केले. आडवाडी येथे गेल्या आठ दिवसापासून जनावरांसाठी छावणी सूरू करण्यात आली आहे. छावनीत ८११ लहान मोठी जनावरे दाखल झाली आहेत. छावणीतील जनावरांना रोगाची लागण होऊ नये म्हणून लाळ खुरकत, घटसर्प आदी रोगांच्या प्रतिबंधात्मक लसी देण्यात येत आहे. ठाणगाव येथील वैद्यकीय अधिकारी सी. एन. हजारी, डॉ. विश्वास वाल्टे, डॉ. निखिल शिंदे, ऋषीकेश देशमुख, नारायण भालेराव यांनी छावनीतील ७०० जनावरानां लसीकरण करण्यात आले. लसीकरणामूळे जनावरांना सहा महिने तरी या आजारापासून दूर राहतील असे वैद्यकीय अधिकारी हजारी यांनी सांगितले .

Web Title: Vaccination of fodder camp animals at Aadwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती