शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
3
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
4
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
5
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
6
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
7
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
8
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
9
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
10
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
11
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
12
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
13
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
14
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
15
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
16
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
17
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
18
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
19
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
20
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील

माहिती अधिकाराचा वापर करुन खंडणी मागणा-या दोघांना अटक

By admin | Updated: September 9, 2016 22:01 IST

माहितीच्या अधिकारांचा वापर करत दमदाटी देऊन खुनाची धमकी देत रोख दोन लाख रुपयांची खंडणी घेणा-या दोघा जणांना क्राईम ब्रॅँच युनिट तीनच्या पथकाने सापळा रचुन अटक केली आहे.

 ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. ९ -  गोविंदनगर येथील उज्वलम् अ‍ॅग्रो मल्टिस्टेट सोसायटीच्या संचालकाला माहितीच्या अधिकारांचा वापर करत दमदाटी देऊन खुनाची धमकी देत रोख दोन लाख रुपयांची खंडणी घेणा-या दोघा जणांना क्राईम ब्रॅँच युनिट तीनच्या पथकाने सापळा रचुन अटक केली आहे. विशेष म्हणजे संशयिताच्या दुकानात दोन गावठी कट्टे व ३० जिवंत काडतुसे मिळुन आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दत्तात्रय कराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
नासर्डी पुल कामत हॉटेल मागील वृंदावन कॉलनीत राहणारे रामचंद्र भागवत यांचे इंदिरानगर भागातील गोविंदनगर येथे उज्वलम् अ‍ॅग्रो मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटी नावाच्या फर्मचे कार्यालय आहे. सामाजिक व आरटीआय कार्यकर्ता म्हणून वावरणारा गणेश वामन कंकाळ (वय ३८) रा. राधानिवास, राजवाडा मधुकर नगर, पाथर्डीगाव याने उज्वलम् अ‍ॅग्रोचे भागवत यांच्याकडे माहितीच्या अधिकारात अर्ज दिला होता. तुमची कंपनी बोगस आहे, चुकीचे कामे करते असे म्हणत कंकाळ गेल्या काही दिवसांपासून धमकावत होता.
 
कंकाळ यांचा दुसरा सहकारी प्रशांत मधुकर अलई (वय ३२) रा. स्वामी हाईटस्, आरटीओ जवळ पेठरोड, पंचवटी हा देखील भागवत यांना धमकावत होता. अलई यांचे राणेनगर भागात स्पंदन झेरॉक्स व सायबर कॅफे आहे. कंकाळ व अलई या दोघांनी ५० लाखांच्या खंडणीची मागणी करत दमदाटी करून खुनाची धमकी दिली होती. 
 
भागवत यांनी सदर प्रकाराबाबत पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांच्याशी संपर्क साधुन सर्व प्रकार सांगितला. कंकाळ, अलई यांचे भागवत यांच्याशी बोलणे होत ३ लाख रुपयांवर तडजोड झाली. मात्र भागवत यांनी माझ्याकडे दोन लाख रुपये आहे ते देतो असे सांगितले. शुक्रवारी दुपारी भागवत स्पंदन झेरॉक्स या दुकानात कंकाळ व अलई यांना पैसे देण्याचे ठरले. त्यानुसार क्राईम ब्रॅँच युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, गंगाधर देवडे, सुभाष गुंजाळ, बाळासाहेब दोंदे, मुक्तार पठाण, रवींद्र बागुल, संजय मुळक, विलास गांगुर्डे, गंगाधर केदार, आत्माराव रेवगडे, मोहन देशमुख, राजेंद्र जाधव आदिंनी सापळा रचला होता. भागवत यांच्याकडून दोन लाख रुपये खंडणीची रक्कम घेत असतांना सापळा रचलेल्या पोलिसांनी कंकाळ, अलई या दोघांना रंगेहाथ पकडले. यावेळी पोलिसांनी स्पंदन झेरॉक्स दुकानाची झडती घेतली असता काऊंटरच्या ड्रॉवरमध्ये दोन गावठी कट्टे व ३० जिवंत काडतुसे मिळुन आली. पोलिसांनी दोन लाखांची रोकड, दोन गावठी कट्टे, ३० जिवंत काडतुसे, दोन मोबाईल, दोन मोटारसायकली असा ४ लाखाचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती गुन्हे विभाग पोलीस उपायुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली.