शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

विवाह सोहळ्याचा खर्च सामाजिक कार्यात वापरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:39 IST

लग्नकार्य व विविध समारंभात टॉवेल-टोपी देण्याची पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. लग्नकार्यातही टोप्या, टॉवेल आणि शाल जमा होतात. त्यामुळे एका कार्यक्रमात हजारो रुपये वायफळ खर्च होतात. त्यामुळे टॉवेल, टोपी, शाल यांच्यासाठी खर्च होणारे पैसे मदत स्वरूपात दिल्यास कार्यक्र मास हातभार लागेल किंवा दानशूर व्यक्तींनी या पैशाचा वापर सामाजिक कार्यात करण्यासाठी सोशल मीडिया सरसावला आहे.

आडगाव : लग्नकार्य व विविध समारंभात टॉवेल-टोपी देण्याची पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. लग्नकार्यातही टोप्या, टॉवेल आणि शाल जमा होतात. त्यामुळे एका कार्यक्रमात हजारो रुपये वायफळ खर्च होतात. त्यामुळे टॉवेल, टोपी, शाल यांच्यासाठी खर्च होणारे पैसे मदत स्वरूपात दिल्यास कार्यक्र मास हातभार लागेल किंवा दानशूर व्यक्तींनी या पैशाचा वापर सामाजिक कार्यात करण्यासाठी सोशल मीडिया सरसावला आहे. आपल्याकडे विविधांगी संस्कृती असल्याने अनेक प्रथा-परंपरा आहेत व त्याचे आदराने आपणदेखील पालन करतो. प्रत्येक प्रथा रूढ होण्यासाठी कारणं असतात. शिवाय अशा प्रथा पूर्वापार चालत आलेल्या असतात. त्यापैकी एक अशीच आपल्या समाजातील प्रथा म्हणजे विविध कार्यक्रमात पुरुषांना टॉवेल-टोपी किंवा शाल-श्रीफळ व महिलांना साडी-चोळी भेट देण्याची प्रथा आहे. त्यापैकी जागरण गोंधळ, दशक्रि या विधी, वर्षश्राद्ध, वास्तुशांती अशा ठिकाणी जास्त प्रचलित आहे. या प्रथेचे मुख्य कारण हे मानपान किंवा इतर काही मदतदेखील असावे.  परंतु सद्यपरिस्थितीत या गोष्टींची किती आवश्यकता आहे याचा वास्तवादी विचारदेखील व्हायला पाहिजे. शिवाय भेट दिल्या जाणाऱ्या वस्त्रांची गुणवत्ता कधी कधी वापरण्या इतपतही चांगली नसते, फक्त आपण कार्यक्रमाला उपस्थित आहोत हे दाखविण्यासाठी सध्या किंवा त्याने आपल्याला दिले म्हणून आपण दिले पाहिजे यासाठी याचा उपयोग होतोय, असे उपहासाने म्हटले तर वावगे ठरणार नाही.  कधी कधी तर ज्या व्यक्तीला आपण ही भेट देतो त्यावेळी इतकी गर्दी झालेली असते की त्याचं साधं लक्षही आपल्या भेटीकडे नसते. परंतु जमणाºया शाल, टोप्या, टॉवेल यांचा मोठा ढीग तयार होऊन ते शेवटी पोत्यात भरावे लागतात. मग कशासाठी एवढा अनावश्यक खर्च. त्यामुळे अशा पैशांचा वापर योग्य ठिकाणी करण्यासाठी विचार करणे गरजेचे आहे. याबाबत जनजागृतीसाठी मेसेजेस सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कार्यक्र मासाठी  आर्थिक मदतसरासरी एक टॉवेल, टोपी किंवा शाल-टोपीसाठी १०० रुपये खर्च पकडला आणि कमीत कमी ५०० नग भेटीत आले तर अनावश्यक अशा पन्नास हजार रु पयांचा खर्च त्या एका कार्यक्र मात होतो. त्यापेक्षा हेच १०० रु पये पॉकेटमध्ये टाकून त्या व्यक्तीला दिले तर नक्कीच त्याला कार्यक्र माच्या खर्चासाठी मोठी आर्थिक मदत होईल.कालानुरूप परंपरा बदलण्याचे आवाहन ....प्रचलित असलेल्या प्रथांबाबत विचार करणे गरजेचे असून, काही रुढी, पारंपरिक पद्धती, कालानुरूप बदलाव्या लागतात किंवा बदलणे गरजेचे असते. जुनं ते मोडू नये आणि नवे करू नये ही वृत्ती बदलून समाजोपयोगी नवीन रुढी-परंपरा सुरू करण्यास काय हरकत आहे? त्यामुळे नवीन पिढी याचे स्वागतच करेल.

टॅग्स :Nashikनाशिक