शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

भुयारी पादचारी मार्गाचा वापर बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:16 IST

महानगराच्या परिघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील द्वारका अंडरपाससह अन्य तीन अंडरपास पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात राष्टय महामार्ग प्राधिकरणाला आतापर्यंत यश मिळू शकलेले नाही.

नाशिक : महानगराच्या परिघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील द्वारका अंडरपाससह अन्य तीन अंडरपास पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात राष्टय महामार्ग प्राधिकरणाला आतापर्यंत यश मिळू शकलेले नाही. त्यामुळे द्वारकासह अन्य तिन्ही अंडरपास ओलांडताना रस्ता क्रॉसिंग करणाऱ्यांना वाचवताना वाहनचालकांची अक्षरश: तारांबळ उडते. काही ठिकाणी तर वाहनचालकांचे किरकोळ अपघात होण्याचे प्रकारदेखील घडत आहेत.महानगरातील सर्वाधिक रहदारीचा आणि त्यामुळे पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत सदैव गजबजलेला द्वारकाच्या परिसरात पादचाºयांच्या सोयीसाठी २०१३ साली अंडरपास बांधण्यात आला. मात्र, तब्बल ६ वर्षे उलटून गेली तरी अंडरपासचा प्रभावीपणे वापर होत नसल्याचे चित्र कायम राहिले. द्वारकाचा हा अंडरपास शहरात सर्वात मोठा असूनही गत सहा-सात वर्षांमध्ये त्याच्या वापराबाबत काहीच प्रगती झालेली नाही. या अंडरपासचा एक भाग द्वारका हॉटेलजवळील सर्व्हिस रोडवर खुला आहे, दुसरा भाग पूर्वीच्या मंदिराजवळ, तिसरा भाग द्वारका पोलीस चौकीजवळ, चौथा भाग गोदावरी हॉटेलजवळ तर अमरधामकडे जाणाºया रस्त्यालगतच्या पाचव्या ठिकाणावरही अंडरपासचा मार्ग खुला आहे. मात्र, इतके पाच प्रवेश असूनही तेवढी माणसेदेखील या अंडरपासमधून रस्ता ओलांडत नाहीत. सायंकाळनंतरच्या वेळी तर बहुतांश प्रवेशद्वारांनजीक गर्दुल्ले या अंडरपासचा आसरा घेत असल्याने त्या भागातून जाणे अधिक धोकादायक ठरू लागले.त्यातून एखादा अनर्थ घडू नये म्हणून दोन वर्षांपूर्वी काही काळ अंडरपास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पंचवटी कॉलेजसमोर असलेल्या अंडरपासबाबत कमी-अधिक प्रमाणात तशीच स्थिती आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाºयांनी द्वारकासह असे चार अंडरपास सुरू करण्याबाबत दोन महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्वरित लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेत नाशिकच्या परिघातील चारही अंडरपास प्रभावीपणे कार्यान्वित करण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.बोगद्यात अंधारमहामार्ग प्राधिकरणच्या वतीने सीसीटीव्ही, लाइट्सह अन्य सुविधा पुरविण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला होता. मात्र बोगद्यात रात्रीच्या वेळी अंधार असतो. तसेच नियम मोडत महामार्गावरूनच रस्ता ओलांडणाºयांवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रत्येक अंडरपासला दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला होता. मात्र, त्याबाबत पुढे कोणतीच हालचाल झालेली नसल्याने अंडरपासची अवस्था ‘जैसे थे’ आहे.वाहनांचे होतात अपघातद्वारका परिसरात वाहनांबरोबर पादचाºयांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे द्वारकाच्या चौकासह त्याच्या बाजूने रस्ता ओलांडणाºयांचे प्रमाण खूप अधिक आहे. अशाप्रकारे रस्ता ओलांडणारे गडबडीत रस्ता ओलाडताना रस्त्यावरून जाणाºया दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना चुकवताना अपघात होण्याचे प्रकारदेखील वाढले आहेत.चौकामध्ये वाहनांचा वेग कमी असल्याने जीवघेणे अपघात घडत नाहीत. मात्र, दुचाकीचालक पडण्यासह त्यांना दुखापत होण्याचे प्रकारदेखील सातत्याने घडत आहेत. त्यामुळे हे अंडरपास लवकरात लवकर प्रभावीपणे कार्यान्वित करण्याची गरज असल्याचा सूर नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.दिवे फुटलेलेद्वारकासह बहुतांश अंडरपासमधील गेट तुटलेले, भंगार म्हणून गर्दुल्ल्यांनी मिळेल तसे उचकटून नेलेल्या अवस्थेत आहेत. तर अनेक ठिकाणी लोखंडी जाळ्या उचकटून आणि दिव्यांच्या काचा फोडून आतील बल्ब गायब केलेले आहेत. त्याशिवाय पान, बार, गुटख्यांचे ढीग जागोजागी विखुरलेले असल्याने त्या रस्त्याने महिलांनाच नव्हे तर सामान्य पुरुषांनादेखील जाणे त्रासदायक ठरते, अशीच त्यांची अवस्था आहे. याबाबत कारवाईची मागणी होत आहे.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीNashikनाशिक