शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एकेरी वाहतुकीचा प्रयोग पहिल्याच दिवशी फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:28 IST

स्मार्ट सिटी अंतर्गत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका रस्त्याचा ‘स्मार्ट विकास’ केला जात आहे. पहिल्या टप्प्यात कामाला प्रारंभ झाला असल्याने शहर वाहतूक शाखेने अशोकस्तंभ ते थेट त्र्यंबक नाक्यापर्यंत एकेरी वाहतूक करण्याचा प्रयोग मंगळवारी (दि. २३) राबविला; मात्र हा प्रयोग पहिल्या चार तासांतच फ सला.

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका रस्त्याचा ‘स्मार्ट विकास’ केला जात आहे. पहिल्या टप्प्यात कामाला प्रारंभ झाला असल्याने शहर वाहतूक शाखेने अशोकस्तंभ ते थेट त्र्यंबक नाक्यापर्यंत एकेरी वाहतूक करण्याचा प्रयोग मंगळवारी (दि. २३) राबविला; मात्र हा प्रयोग पहिल्या चार तासांतच फ सला. वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहतूक व्यवस्थेचा फज्जा उडाल्याने शहर वाहतूक नियंत्रण शाखेला नाशिककरांच्या रोषाचा सामना करावा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले.  मेहेर सिग्नल ते सीबीएस सिग्नलपर्यंत दुहेरी वाहतूक मंगळवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू होती. कारण शासकीय कन्या विद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्ता विकसित केला जात आहे. अशाच पद्धतीने सीबीएस ते त्र्यंबक नाक्यापर्यंतचा रस्ता विकसित केला जाणार असल्याने तत्पूर्वी पोलिसांनी या रस्त्यावरील दुहेरी वाहतूक वळविण्याचा केविलवाणा प्रयत्न मंगळवारी केला; मात्र हा प्रयत्न शहर वाहतूक शाखेच्या अंगलट आला आणि वाहतूक पोलीसही गोंधळात सापडले. सीबीएस चौकात दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले.मुंबई नाक्याकडून अशोकस्तंभाकडे जाणाऱ्या वाहनांना दुपारी नव्या अधिसूचनेनुसार प्रवेश दिला जात होता; मात्र शालिमारकडून डावीकडे तसेच शरणपूररोडवरून सीबीएस सिग्नलवरुन उजवीकडे वळण घेत त्र्यंबक नाक्याकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली होती. यामुळे सीबीएस चौकात वाहतूक कोंडी झाली. परिणामी शरणपूररोडवरही वाहनांच्या रांगा लागल्या. तसेच शालिमार-सीबीएस रस्त्यावरही वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यामुळे नाशिककरांनी पोलिसांच्या नियोजन व नव्या बदलाविषयी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी काहींनी अधिसूचना पालन करण्याकडे दुर्लक्ष केले तर काहींचे वाहतूक पोलिसांसोबत खटके उडाले.पर्यायी मार्गाला नापसंती मुंबईनाक्याकडून सीबीएस, शरणपूररोड अशोकस्तंभाकडे जाण्यासाठी वाहनांना प्रवेश दिला जात होता; मात्र रविवार कारंजावर वाहतुकीचा ताण निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी पंचवटीकडे जाणाºया वाहनांनी मुंबईनाका येथूनच थेट महामार्गाने वडाळानाक्यापर्यंत जाऊन द्वारका, आडगावनाका, काट्या मारुती चौकातून निमाणी या मार्गाचा अवलंब करावा, असे अधिसूचनेत म्हटले होते; मात्र वाहनचालकांनी या लांब पल्ल्याच्या पर्यायी मार्गाकडे दुर्लक्ष करणे पसंत केले. त्यामुळे मेहेर चौक, अशोकस्तंभ व रविवार कारंजा चौकात वाहतूक कोंडी निर्माण झाली.प्रयोगाचा आज दुसरा दिवस रविवारी (दि.२१) प्रसिद्ध करण्यात आलेल्या वाहतूक नियंत्रण अधिसूचनेचा बुधवारी (दि. २४) दुसरा दिवस असणार आहे. पोलिसांकडून पुन्हा असा प्रयोग या मार्गावर नियोजित वेळेनुसार राबविला जाणार असल्याची शक्यता आहे. तसेच या प्रयोगामुळे वाहतूक कोंडी आणि पर्यायी मार्गावरील वाहतूक वळविल्यामुळे अन्य रस्त्यांवर येणारा ताण शहर वाहतूक शाखेकडून विचारात घेतला जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसNashikनाशिक