शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पाणी खेचण्यासाठी वीज मोटारींचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 00:07 IST

पंचवटीतील हिरावाडी परिसर, शिवकृपानगर, कमलनगर, अयोध्यानगरी, कळस्करनगर, भगवतीनगर या परिसरात पाणी भरण्यासाठी सर्रासपणे वीज मोटारींचा वापर केला जात असला तरी महापालिका प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने कारवाई करणार कोण असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.

पंचवटी : पंचवटीतील हिरावाडी परिसर, शिवकृपानगर, कमलनगर, अयोध्यानगरी, कळस्करनगर, भगवतीनगर या परिसरात पाणी भरण्यासाठी सर्रासपणे वीज मोटारींचा वापर केला जात असला तरी महापालिका प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने कारवाई करणार कोण असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.महापालिकेकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा कमी दाबाने व अपुरा होत असल्यामुळे पुरेसे व वेगाने पाणी भरता यावे यासाठी अनेक बंगलेधारक तसेच रो-हाउसमध्ये राहणारे नागरिक सर्रासपणे नियमांची पायमल्ली करत वीज मोटारींचा वापर करतात. मोठ्या प्रमाणात पाणी खेचले जात असल्यामुळे अन्य नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. पाणी भरण्यासाठी नागरिकांनी वीज मोटारींचा वापर टाळावा, असे आवाहन करून वीज मोटारींचा वापर करणाऱ्यांवर मनपा प्रशासनाकडून कारवाई केली जाईल, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र संबंधित विभागाकडून पंचवटीत अद्याप पावेतो कारवाई शून्य असल्याने मनपाच्या आदेशाला नागरिकांनी केराची टोपली दाखविली असल्याचे स्पष्ट झाले आहे.उन्हाळा सुरू असल्याने शहरात काही भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे प्रशासनाकडून सुचविले जाते; मात्र वीज मोटारीच्या सहाय्याने वेगाने पाणी खेचून भरण्याच्या प्रयत्नात अनेक ठिकाणी पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र दिसून येते.सार्वजनिक स्टँड पोस्टवर अपव्ययमहापालिका प्रशासनाच्या वतीने गावठाण परिसरात राहणाºया नागरिकांसाठी सार्वजनिक स्टँड पोस्ट उभारलेले आहे. पंचवटी परिसरातील सार्वजनिक स्टँड पोस्टवर सकाळ व सायंकाळच्या सुमाराला महिला धुणी-भांडी करत हजारो लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करत असल्याचे चित्र दैनंदिन दिसून येते. बंगलेधारक सकाळ व सायंकाळच्या वेळी घराबाहेर रस्त्यावर पाण्याचा सडा मारून पाण्याचा अपव्यय करत असल्याने त्यांच्यावरदेखील दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी