शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी इमारती विनावापर पडून

By admin | Updated: January 20, 2016 22:19 IST

छगन भुजबळ यांचे आरोग्यमंत्र्यांना निवेदन

येवला : प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीची बांधकामे पूर्ण होऊन वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी नसल्याने या इमारती सध्या विनावापर पडून असून, कर्मचारीवर्ग व वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी आमदार छगन भुजबळ यांनी एका निवेदनाद्वारे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे केली आहे. अंदरसूल, कातरणी, अनकई, नगरसूल येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे मंजूर होऊन ही उपकेंदे्र नवीन इमारतीत कार्यरत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, भारम (ता. येवला) तसेच खिर्डीसाठे व भुलेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे भारम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारतही पूर्ण झाली असून, कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक झाली नसल्याने या परिसरातील रुग्णांना आरोग्य केंद्र असूनही सुविधा मिळू शकत नाही. यासंदर्भात आढावा बैठकीत आमदार भुजबळ यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध मंजूर करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर करून तीन महिने उलटूनही काहीच कार्यवाही झालेली नाही. नवीन आकृतिबंध मंजूर नसल्यामुळे या सुसज्ज इमारती विनावापर पडून आहेत.येवला शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रु ग्णालयात रूपांतर करून सुसज्ज आणि आधुनिक पद्धतीचे ग्रामीण रु ग्णालय सुरू आहे. येवल्यात ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास जून २०१४ मध्येच मान्यता देण्यात आली आहे.उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता मिळण्याकरिता १० कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकासह प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे सादर केलेला आहे. याबाबतही लक्ष घालून प्रशासकीय मान्यता प्रदान करून निधी उपलब्ध करून द्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)